Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीती-राघव यांच्या लग्नात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लावले ठुमके; भगवंत मान यांचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:37 IST

Parineeti-Raghav Wedding : परिणीती आणि राघव यांनी सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा यांनी रविवारी(२४ सप्टेंबर) लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांनी सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही हजेरी लावली होती. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील भगवंत मान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भगवंत मान यांनी परिणीती आणि राघव यांच्या संगीत सोहळ्यात ठुमके लावले. परिणीती-राघव यांच्या संगीत सोहळ्यातील भगवंत मान यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भगवंत मान पंजाबी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. 

Parineeti-Raghav Wedding: 'राघव की दुल्हनिया', परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पाहा

वरिंदर चावला या इन्स्टाग्राम पेजवरुन भगवंत मान यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. परिणीती आणि राघव यांच्या संगीत सोहळ्यातील या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. परिणीती आणि राघव यांनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर ते तीन ग्रँड रिसेप्शन देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत.  

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटीभगवंत मान