Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉफी, लंडन ते एक ओंकार... परिणीतीच्या कलीरेमध्ये दडलीय जोडप्याची रोमँटिक स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 13:47 IST

कलीरेमध्ये परिणीती आणि राघव चढ्ढाची लव्हस्टोरी दाखवण्यात आली.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांचा २४ सप्टेंबर रोजी रोजी लग्न झालं. पारंपारिक पंजाबी पद्धतीने शाही थाटात हा विवाह सोहळा उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये पार पडला. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची, त्यांच्या वेडिंग लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. परिणीतीने लग्नासाठी केवळ लेहेंगाच नाही, तर ज्वेलरीही खास निवडली होती. तिच्या कलीराकडे सगळ्यांचेच लक्ष गेले. ते खास डिझाइन करण्यात आले होते. या कलीरेमध्ये परिणीती आणि राघव चढ्ढाची लव्हस्टोरी दाखवण्यात आली.

परिणीतीने तिच्या हातात कलीरे घातले होते. मृणालिनी चंद्रा यांनी कियाराचे कलीरे डिझाईन केले होते. यामध्ये तिने खास टच दिलायं.  मृणालिनी चंद्रा यांनी इन्स्टाग्रामवर कलीरांचा एक फोटो पोस्ट केला. त्यात हे खास डिझाइन पाहायला मिळत आहेत.  कलीरेमध्ये कॉफी मग, लंडन एक ओंकार, परिणीती-राघवच्या नावाची पहिली अक्षरं, विमान अशा अनेक गोष्टी आहेत. यातून दोघांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.

 मृणालिनी चंद्राने पोस्टमध्ये म्हटलं की, "परिणीतीसाठी कलीरे, चुडा आणि लेहेंगा लटकन बनवण्याचा प्रवास आनंदायी होता. परिणिती आणि राघवची लव्हस्टोरी ही खरोखरच आधुनिक काळातील एक परीकथा आहे. राघवसोबतचा प्रेमाने भरलेल्या प्रवासानुसार प्रत्येक गोष्टींची निवड करण्यात आली. यातून एक सुंदर प्रेम कहाणी दिसतेयं. आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप आभार! हा खरोखरच एक खास प्रवास होता". 

लग्नासाठी परिणीती व राघव यांनी पेस्टल रंगाचे कपडे लग्नासाठी निवडले. परिणीतीने अगदी न्यूड मेकअप केला आहे. तसेच दागिनेही खूप कमी घातले आहेत. गळ्यात कपड्यांवरचं मॅचिंग चोकर, मांगटिका आणि नाजुक कानातले तिने घातले होते. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.  या लुकसोबतच तिने डोक्यावर एक लांब ओढणी देखील घेतली होती. या ओढणीवर 'राघव' असं नाव लिहिलं होतं. तसेच ओढणीवरच्या कडेला गोल्डन वर्क केलेलं होतं. 

मनीष मल्होत्राने परिणीती चोप्राचा संपूर्ण वेडिंग लूक डिझाइन केला होता.  शिवाय, तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो उदयपूरलाही पोहोचला होता. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला सानिया मिर्झा, मधु चोप्रा, हरभजन सिंग, सीएम अरविंद केजरीवाल, पंजाबचे सीएम भगवंत मान यांच्यासह अनेक स्टार्स आणि बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर परिणीती-राघव तीन ग्रँड रिसेप्शन देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडसेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. 

टॅग्स :परिणीती चोप्राबॉलिवूडसेलिब्रिटीआप