Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 11:00 IST

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा व आप खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा मे महिन्यात पार पडला. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. नुकतंच त्या दोघांना अमृतसरमधील सुवर्णमंदिरात स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा ऑक्टोबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती हिंदुस्तान टाइम्सच्या सूत्रांनी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती व राघव गुरुग्राम येथे वेडिंग रिसेप्शन देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याबरोबरच मुंबई आणि चंदीगड येथेही वेडिंग रिसेप्शन देण्यात येणार आहे. दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

“कॅन्सर झाल्याचं कळताच नानांनी मला आयपीएल बघायला नेलं अन्...”, अतुल परचुरेंनी सांगितली आठवण

गुरुग्राम येथील द लीला अँबियस हॉटेल येथे परिणीती व राघव चड्ढा यांचं वेडिंग रिसेप्शन होणार आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचा मेन्यूही ठरला आहे. नुकतंच परिणीती आणि राघव यांच्या आईवडिलांनी रिसेप्शनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा मेन्यूही ठरवण्यात आल्याची माहिती आहे.

“गश्मीरने माझ्या ‘देवता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये...”, रवींद्र महाजनी यांनी व्यक्त केलेली इच्छा

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’ येथून शिक्षण घेतलं आहे. तिथेच त्यांची मैत्री झाली. काही महिन्यांपूर्वी राघव चड्ढा परिणीतीला तिच्या शूटिंगदरम्यान पंजाबमध्ये भेटले होते. तेव्हापासून त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं.

 

टॅग्स :परिणीती चोप्राप्रियंका चोप्राबॉलिवूड