Join us

शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:09 IST

परेश रावल यांना 'या' खानसोबत काम करायला जास्त आवडतं, कारण..

अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली आहे. बाबुराव आपटे हे त्यांचं कॅरेक्टर तर सर्वांचंच आवडीचं आहे. परेश रावल यांचं थिएटरवरही सर्वात जास्त प्रेम आहे. थिएटरमध्ये काम केल्यामुळेच त्यांचा अभिनय दमदार असतो. नुकतंच परेश रावल यांनी बॉलिवूडमधील तीन खान यांच्याबद्दल भाष्य केलं. कोणासोबत काम करायला जास्त आवडतं याचंही त्यांनी उत्तर दिलं.

आमिर आणि सलमानविषयी परेश रावल यांचं मत

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले, "मला वैयक्तिकरित्या आमिर खानसोबत काम करायला जास्त आवडतं. तो कोणत्याही प्रकारच्या हावभाव किंवा रितीभातींवर विश्वास करत नाही. तर दुसरीकडे सलमान खान एकदम नॅचरल अभिनेता आहे. वेगळाच आहे. त्याचं एक वेगळं आकर्षण आणि करिश्मा असतो."

शाहरुख खानचीही केली स्तुती

शाहरुख खानची स्तुती करताना ते म्हणाले,"शाहरुखमध्ये खूप हिंमत आहे. स्वदेस सिनेमात त्याने किती दमदार काम केलं आहे. हा शाहरुख आहे यावर विश्वासच बसत नाही. एकूणच अभिनयात कोणीही महान, श्रेष्ठ किंवा वाईट नसतो. प्रत्येकजण आपापल्या जागी वेगळा आणि योग्य असतो."

परेश रावल यांनी सलमानसोबत 'रेडी', 'अंदाज अपना अपना', 'दुल्हन हम ले जाएंगे' सिनेमात काम केलं आहे. तर शाहरुखसोबत ते 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' मध्ये झळकले आहेत. 

टॅग्स :परेश रावलशाहरुख खानसलमान खानआमिर खानबॉलिवूड