Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे 'हेरा फेरी ३'ला होतोय उशीर, परेश रावल यांचा खुलासा; अक्षयसोबतच्या वादावर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:18 IST

'हेरा फेरा ३'चं काय झालं? परेश रावल यांनी दिलं उत्तर

परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीचा सुपरहिट 'हेरा फेरी' सिनेमाच्या तिसऱ्या भागाचं सध्या शूट सुरु आहे. परेश रावल यांचं बाबुराव आपटे कॅरेक्टर प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. काही महिन्यांपूर्वी 'हेरा फेरी ३'चा वाद समोर आला होता. परेश रावल यांनी अचानक सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला होता. यावर अक्षय कुमारने त्यांच्यावर २५ कोटींचा नुकसानभरपाईचा दावा केला होता. काही दिवसांनी वाद मिटला आणि परेश रावल यांची पुन्हा एन्ट्री झाली. आता पुन्हा सिनेमाला का विलंब होतोय याचं कारण परेश रावल यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

'द लवारी शो'ला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले, "हेरा फेरी ३ नक्कीच येणार आहे. पण सिनेमाला विलंब होत आहे याच्याशी माझा संबंध नाही. अक्षय कुमार आणि मेकर्स यांच्यात काही टेक्निकल अडचणी आल्या आहेत. यामुळेच सिनेमाला उशीर होत आहे."

अक्षय कुमारने २५ कोटींच्या नुकसानभरपाईची केस केली यावर परेश रावल म्हणाले, "याची जरा जास्तच चर्चा झाली. अक्षयने माझ्यावर २५ कोटींची केस केली ते सगळं ठीक आहे...हे म्हणजे कछुआ छाप अगरबत्तीसारखं आहे. जेव्हा अक्षय आणि मेकर्समधला वाद मिटेल तेव्हा मी सिनेमा साईन करायला तयार आहे."

बाबूराव शिवाय सिनेमा 'डिझास्टर'

बाबूराव या आयकॉनिक भूमिकेवर परेश रावल म्हणाले, "बाबूरावशिवाय हा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला तर तो डिझास्टर होईल. बाबूरावशिवाय हेरा फेरी होऊच शकत नाही."

English
हिंदी सारांश
Web Title : 'Hera Pheri 3' Delay: Paresh Rawal Reveals Reason, Addresses Akshay Dispute

Web Summary : Paresh Rawal clarifies 'Hera Pheri 3' delay is due to technical issues between Akshay Kumar and makers. He dismissed rumors of a lawsuit, stating he's ready to sign once the dispute is resolved. Rawal emphasizes Babu Rao's indispensable role for the film's success.
टॅग्स :परेश रावलबॉलिवूडअक्षय कुमारसुनील शेट्टी