Join us

Akshay Kumar Samrat Prithviraj : “चित्रपटगृहांत EVM असते तर अक्षय, कंगनाचे चित्रपट फ्लॉपच झाले नसते,” काँग्रेसच्या महिला नेत्याचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:51 IST

Akshay Kumar Samrat Prithviraj : अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या सम्राट पृथ्वीराजला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. यावरून काँग्रेसच्या महिला नेत्यानं टोला लगावलं.

Akshay Kumar Samrat Prithviraj : नुकताच प्रदर्शित झालेला आणि अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. प्रदर्शित झाल्याच्या पाच दिवसांनंतरही मानुषी छिल्लर आणि अक्षय कुमार यांच्या या चित्रपटाला ५० कोटी रूपयांचा आकडा पार करता आलेला नाही. यावरून अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शाळाही घेतली. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या पंखुडी पाठक यांनीदेखील यावरून टोला लगावला आहे.  “जर चित्रपटगृहांमध्ये ईव्हीएम असते तर कंगना रणौत आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट कधीही फ्लॉप झाले नसते,” असं म्हणत काँग्रेसच्या नेत्या पंखुडी पाठक यांनी टोला लगावला. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनीही शाळा घेतली. दरम्यान, सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करता आली नाही. विकेंडला हा चित्रपट चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. परंतु तसंही झालं नाही. 

चित्रपटानं पाचव्या दिवशी म्हणजे ७ जून रोजी केवळ ४.४० कोटी रूपयांची कमाई केली. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन ४८.८० कोटी रूपये होतं. पहिल्या दिवशी या चित्रपटानं १०.७० कोटी रूपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी १२.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १६ कोटी रूपयांची कमाई केली. परंतु चौथ्या आणि पाचव्या दिवशी यात मोठी घसरण झाली. 

कंगनाचा ‘धाकड’ही फ्लॉपकंगना रणौतच्या धाकडलाही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आलेली नाही. इतकंच नाही, तर सोशल मीडियावर अनेकांनी याची शाळाही घेतली. आठव्या दिवशी संपूर्ण देशात या चित्रपटाची केवळ २० तिकिटे विकली गेल्याची माहिती समोर आली होती. तसंच अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो कॅन्सल करण्यात आले होते. याशिवाय ओटीटीवर हा चित्रपट दाखवण्यासाठीही निर्मात्यांना खुप मेहनत घ्यावी लागली होती.

टॅग्स :अक्षय कुमारकंगना राणौतएव्हीएम मशीनकाँग्रेस