Join us
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला जाणार का? पंकज त्रिपाठींनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 13:22 IST

अभिनेता पंकज त्रिपाठी 'मै अटल हूं' सिनेमामुळे चर्चेत आहेत.

दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारे पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी 'मै अटल हूं' सिनेमामुळे चर्चेत आहेत. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी वाजपेयींची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सध्या ते 'मै अटल हूं' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.  सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. एका मुलाखतीत त्यांनी राम मंदिराला भेट देण्याच्या प्लॅनवर भाष्य केलं. 

आयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. पद्मश्री मिळवणाऱ्या मनोज वाजपेयी यांनी नुकतेच न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना रामलल्लाच्या दर्शनाला जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले,  मला निमंत्रण आलेले नाही आणि अयोध्येत त्या दिवशी खूप गर्दी होणार आहे. त्यामुळे आता जाणार नाही'.

ते म्हणाले की, 'रामलल्लाचा अभिषेक झाल्यानंतर साधारण २-३ महिन्यांनी मी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेईन.मी अनेकदा अयोध्येला जातो. दिखाऊपणावर विश्वास ठेवत नाही, म्हणून मी सोशल मीडियावर सार्वजनिकपणे शेअर न करता तीर्थक्षेत्रांना भेट देणे पसंत करतो. आणि यावेळीही रामलल्लाच्या दर्शनासाठी पत्नी आणि मुलीसोबत मी अयोध्येला जाणार आहे. मला शांतपणे दर्शन घ्यायचे आहे'. 

पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूं' हा चित्रपट 19 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमातील पंकज त्रिपाठींच्या लूक पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. शिवाय या सिनेमात अनेक मराठी कलाकारही पाहायला मिळणार आहेत. 

टॅग्स :पंकज त्रिपाठीसेलिब्रिटीबॉलिवूडअयोध्याराम मंदिर