Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कालीन भैय्या'ची इंस्टाग्रामवर एन्ट्री, शेअर केला 'मिर्झापूर २'चा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 18:17 IST

पंकज त्रिपाठीने मिर्झापूर सीरिजला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे.

अभिनेता पंकज त्रिपाठीने बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या चांगल्या लक्षात राहिल्या आहेत. अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूर या वेबसीरिजमध्ये कालीन भैय्याची भूमिका तरूणाईमध्ये हिट ठरली. या वेबसीरिजला एक वर्ष पूर्ण झाले असून या सीरिजचा फोटो शेअर करत त्याने इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे.

पंकज त्रिपाठीने इंस्टाग्रामवर पहिली पोस्ट म्हणून मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनचा टीझर शेअर केला आहे आणि लिहिलं की, आपण बनवूयात इंस्टाग्रामला मिर्झापूर.पंकज त्रिपाठीने मिर्झापूरला एक वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उत्सुक असल्याचं सांगत लिहिलं की, मिर्झापूरला एक वर्ष झाले आणि हे एक दमदार वर्ष राहिले आहे. मिर्झापूर शोमुळे मला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले व प्रशंसा मिळाली. मी जिथे कुठे जातो तिथे लोक मला कालीन भैय्या म्हणून ओळखतात. या सीरिजच्या पुढील सीझनच्या बाबतीत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे आणि ते मला नेहमी विचारतात की कधी रिलीज होणार आहे. मी दोन्ही सीझनच्या बाबतीत उत्साही आहे. त्यामुळे मी मिर्झापूरच्या पहिल्या वाढदिवसादिवशीच इंस्टाग्रामवर पदार्पण करतो आहे.

इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडल्यानंतर काही तासांतच त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागली आहे. पंकजने अद्याप कोणालाही फॉलो केलेलं नाही.

टॅग्स :पंकज त्रिपाठीइन्स्टाग्राममिर्झापूर वेबसीरिज