Join us
Daily Top 2Weekly Top 5

४००० कोटींचं बजेट असलेल्या 'रामायण' मध्ये 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, साकारणार 'कुंभकर्णा'चं पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:15 IST

'पंचायत' फेम अभिनेत्याला लॉटरी लागली! नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये झाली एन्ट्री, साकारणार ही भूमिका 

Ramayana Movie: नमित मल्होत्रा प्रस्तुत आणि नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'रामायण' या सिनेमाची गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजनविश्वात प्रचंड चर्चा सुरु आहे. रणबीर कपूर या चित्रपटात रामाची भूमिका साकारणार आहे; तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्यासह अभिनेता सनी देओल, यश, रवी दुबे, आदिनाथ कोठारे यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत. रामायणसिनेमाची घोषणा झाल्यापासूनच त्यातील कास्टिंग चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच चित्रपटाबद्दल आणखी एक अपडेट समोर येत आहे.

दरम्यान, रामायण चित्रपटात यापूर्वी रावणाच्या धाकट्या भावाच्या कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी अभिनेता बॉबी देओलचं नाव पुढे आलं होतं, परंतु आता या भूमिकेसाठी एका नवीन अभिनेत्याचे नाव फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, 'पंचायत' या गाजलेल्या वेब सीरिजमधील अभिनेता फैजल मलिकची या चित्रपटात वर्णी लागली आहे. अभिनेता फैसल मलिक बहुचर्चित आणि रामायणमध्ये 'कुंभकर्ण' या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'कुंभकर्ण' या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. अभिनेत्याने चित्रपटाचे पहिल्या शेड्यूलचं शूटिंग पूर्ण केलं आहे. येत्या दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, याबाबत रामायणची टीम किंवा फैसलने सुद्धा कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

मिडिया रिपोर्टनुसार, फैजलची शरीरयष्टी आणि त्याचं भारदस्त व्यक्तिमत्व हे कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचं दिग्दर्शकांचं मत आहे. याच कारणामुळे त्याला कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं आहे. अभिनेत फैसल मलिकने मुंबईच्या प्राइम फोकस स्टुडिओमध्ये इंटरनॅशनल ॲक्शन क्रूसोबत कुंभकर्णाच्या इंट्रोडक्शनचा सीन शूट केला आहे. केजीएफ फेम अभिनेता यशसोबत फैजलने हा सीन शूट केल्याचं सांगितलं जातंय. तसेच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं शूट अद्याप झालेलं नाही.

दरम्यान, रामायण सिनेमाचा पहिला भाग २०२६ आणि दुसरा भाग २०२७ साली येणार आहे. या चित्रपटाचं एकूण बजेट ४००० कोटी इतकं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Faisal Malik to play Kumbhakarna in ₹4000 crore 'Ramayana'.

Web Summary : Faisal Malik, from 'Panchayat,' will portray Kumbhakarna in the upcoming 'Ramayana' movie. He has already filmed scenes with Yash. The film, budgeted at ₹4000 crore, is slated for release in two parts, 2026 and 2027.
टॅग्स :बॉलिवूडसिनेमारामायणरणबीर कपूर