लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत विवाह मोडल्यानंतर आता मुच्छल एका तक्रारीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. पलाश मुच्छलने सुमारे ४० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे सांगलीतील बालमित्र विज्ञान माने यांनी केला आहे. याबाबत थेट पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीत माने यांनी म्हटले आहे, मी चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच चित्रपटनिर्मितीही करतो. महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्याशी लहानपणापासून ओळख आहे.
२५ लाखांच्या गुंतवणुकीवर ३७ लाख देण्याची हमी
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांनीच पलाश मुच्छल (रा. ३०१, सिल्व्हर आर्क टॉवर, अंधेरी पश्चिम, मुंबई) याच्या चित्रपटात गुंतवणूक करण्यास सुचविले. ५ डिसेंबर २०२३ रोजी पलाश सांगलीत आल्यानंतर त्याने ‘नजरिया’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याचे सांगितले. चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित झाल्यानंतर २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १२ लाख रुपये अधिक मोबदला तसेच चित्रपटात अभिनयाची संधी देऊ असे आश्वासन दिले.
पुन्हा पैशाची मागणी केली
सप्टेंबर २०२४ मध्ये नवकृष्णा व्हॅली परिसरात पलाश याला २० लाख रोख दिले. यावेळी श्रीनिवास मानधना हेही उपस्थित होते. त्यानंतर पाच दिवसांनी आणखी ५ लाख दिले. शूटिंग संपल्यावर आणखी एक लाख रुपये घेतले. त्यानंतर पलाशने मला दि. २ जानेवारी रोजी मुंबईतील घरी बोलावून घेतले. तेथे पैशाबद्दल चर्चा केली असता त्याने माझ्याकडेच पैशाची मागणी केली, असे माने यांनी म्हटले आहे.
Web Summary : After calling off his wedding with Smriti Mandhana, Palash Mucchal faces fraud allegations. Vignan Mane accuses him of a ₹40 lakh scam related to a film investment. Mane has filed a complaint with the police seeking action.
Web Summary : स्मृति मंधाना से शादी टूटने के बाद, पलाश मुच्छल पर धोखाधड़ी के आरोप लगे हैं। विज्ञान माने ने फिल्म निवेश से जुड़े ₹40 लाख के घोटाले का आरोप लगाया है। माने ने पुलिस में शिकायत दर्ज कर कार्रवाई की मांग की है।