९० च्या दशकातला सुपरस्टार सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. करणचा ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झालाय. सनी पाजीच्या मुलाला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच मोठी प्रतीक्षा केली. पण ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. होय, येत्या १९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
first look: ‘पल पल दिल के पास’चे पोस्टर पाहून तुम्हाला आठवेल सनी देओलचा ‘बेताब’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:33 IST
९० च्या दशकातला सुपरस्टार सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. करणचा ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झालाय.
first look: ‘पल पल दिल के पास’चे पोस्टर पाहून तुम्हाला आठवेल सनी देओलचा ‘बेताब’!!
ठळक मुद्देसनी आणि अमृता सिंगच्या पहिल्यावहिल्या ‘बेताब’ या चित्रपटाची आठवण करून देणारे ‘पल पल दिल के पास’च्या या पोस्टर पोस्टरमध्ये करण देओल पापा सनी देओलप्रमाणे काहीशा लाज-या अंदाजात दिसतोय. तर सहर एकदम फ्रेश आणि सुंदर दिसतेय.