रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी, एका व्हायरल व्हिडिओमुळे हा चित्रपट आणखी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरील या व्हिडीओत एक कुटुंब चित्रपटगृहात 'मेजर इक्बाल'चं कौतुक करताना आणि 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहे. पाकिस्तानी कुटुंबाने त्यांना 'धुरंधर २' कसा वाटला हेही सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ एका सिनेमागृहातील असून या संपूर्ण कुटुंबाने 'धुरंधर २' बघितला. या कुटुंबाला हा चित्रपट अजिबात आवडलेला नाही. व्हिडीओतील एका माणूस म्हणतो, ''थर्ड क्लास मूव्ही. आयुष्यात असा थर्ड क्लास मूव्ही पाहिला नाही.'', दुसरा एकजण म्हणतो, ''मेजर इक्बाल काय बोलला समजलं ना!'', दुसऱ्या एकाने पहिल्या भागाचं कौतुक केलं आहे, ''पहिला भाग खूप चांगला होता. हा भाग पहिल्या भागापेक्षा खूप वाईट आहे.'' त्यानंतर या कुटुंबाने ''मेजर इक्बाल जिंदाबाद''च्या घोषणा दिल्या.
Web Summary : A Pakistani family's video review of 'Dhurandhar 2' went viral, criticizing it as inferior to the first film and praising Major Iqbal. They missed Akshay Khanna's performance. Despite criticism, the film crossed ₹500 crore in four days.
Web Summary : पाकिस्तानी परिवार का 'धुरंधर 2' का वीडियो वायरल हुआ, जिसमें इसे पहली फिल्म से घटिया बताया गया और मेजर इकबाल की प्रशंसा की गई। उन्होंने अक्षय खन्ना के प्रदर्शन को याद किया। आलोचना के बावजूद, फिल्म ने चार दिनों में ₹500 करोड़ का आंकड़ा पार कर लिया।