Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया करतेय बादशाहला डेट? दोघांचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 19:37 IST

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आणि गायक आणि रॅपर बादशाहसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर भारतात चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या सौंदर्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. अभिनेत्रीचे गायक आणि रॅपर बादशाहसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. हानिया आमिर आणि बादशाह नुकतेच एकत्र दिसले होते. ज्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या डेटींगची अटकळ बांधली जात आहे. दोघेही डेट करत आहेत का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. 

हानिया आमिर आणि बादशाह एकत्र शॉपिंग आणि कॉफी डेटवर गेले होते. अभिनेत्रीने 1 डिसेंबर 2023 रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बादशाहसोबतचे बरेच फोटो शेअर केले . फोटोंमध्ये हानिया आणि बादशाह कॉफी पिताना दिसत आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये बादशाह हिरव्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे, तर हानिया निळ्या रंगाच्या टँक टॉपमध्ये गोंडस दिसत आहे.

काही दिवसांपासून हानिया आमिरचे नाव पाकिस्तानी क्रिकेटर बाबर आझमसोबत जोडले जात आहे. मात्र, आतापर्यंत दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हानिया आमिर ही पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. लोड वेडिंग, सुपरस्टार यांसारख्या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. तसेच तिला तितली, दिलरुबा, मेरे हमसफर या मालिकांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 

टॅग्स :बादशहापाकिस्तानबॉलिवूडसेलिब्रिटी