Join us

पाकिस्तानात अभिनेत्याने संस्कृतमध्ये "सरस्वती वंदना" गायली, कसा होता प्रेक्षकांचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:17 IST

 एक पाकिस्तानी अभिनेता संस्कृत बोलतोय, हे पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

Pakistani Actor Alyy Khan:  पाकिस्तानी कलाकारांची चर्चा भारतात होत असते. अनेक पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम करत घसघशीत कमाईसोबतच विशेष लोकप्रियता मिळवली. बॉलिवूडमध्ये काम केलेला पाकिस्तानी अभिनेता अली खान सध्या चर्चेत आला आहे. या मुस्लिम अभिनेत्यानं पाकिस्तानी शोमध्ये अस्खलित संस्कृतमध्ये "सरस्वती वंदना" गायली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

नुकतंच अली खानने एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अली खाननं त्याला उर्दू, हिंदी आणि संस्कृत या तिन्ही भाषेचं ज्ञान असल्याचं सांगितलं.  यानंतर उदाहरणादाखल "सरस्वती वंदना" म्हणून दाखवली. यावेळी तो शेवटचे काही शब्द विसरला. पण तरीही त्याचे उच्चार आणि पाठांतर बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  एक पाकिस्तानी अभिनेता संस्कृत बोलतोय, हे पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

अली खानने काजोलसोबत 'द ट्रायल' या वेब सिरीजमध्ये काम केलं होतं.  याशिवाय त्याने 'लक बाय चान्स', 'डॉन २' आणि 'द आर्चीज' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. पाकिस्तानी असूनही अभिनेत्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतीय प्रेक्षकांमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

2016 मध्ये उरी येथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील विविध कलाकार आणि चित्रपट संघटनांनी पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करण्यास बंदी घातली होती. तेव्हापासून पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूमध्ये काम दिलं जात नाही. भारत-पाकिस्तानचे संबंध सुधरत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नाही असं ठरवलं होतं. ते्व्हापासून पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये जास्त काम मिळत नाही. 

टॅग्स :सेलिब्रिटीपाकिस्तानभारत