Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचं दार उघडलं! तब्बल ७ वर्षांनंतर अतिफ अस्लमचं कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 17:23 IST

भारतातील अतिफ अस्लमच्या चाहत्यांना सुरांची अस्सल मेजवाणी मिळणार आहे.

Atif Aslam : अतिफ अस्लमने बॉलिवूडला त्याच्या सदाबहार गाण्यांनी मंत्रमुग्ध केले. हिंदी सिनेसृष्टीत त्याने गायलेली गाणी हिट ठरली आहेत. अतिफ अस्लमची ओळख जरी पाकिस्तानी गायक असली तरी भारतामध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्याच्या आवाजाचे अनेक लोक चाहते आहेत.

असं असलं तरी काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांना हिंदी सिनेमांचे पार्श्वगायन करण्यास बंदी घातली होती.  त्यामुळे अतिफ अस्लम सिनेसृष्टीपासून काही काळ लांब होता. मात्र आता अलीकडे ही बंदी हटवण्यात आली आहे.  त्यामुळे आता तब्बल ७ वर्षानंतर हा गायक त्याच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी परतणार आहे. या निमित्ताने भारतातील अतिफ अस्लमच्या चाहत्यांना सुरांची अस्सल मेजवाणी मिळणार आहे.

जैसे- तू जाने ना, पहली नजर में, तेरा होने लगा हूं, बदलापुर का गाना “जीना जीना’ यांसारख्या गाण्याने अतिफने चाहत्यांच्या प्ले लिस्टमध्ये स्वत: ची वेगळीच जागा निर्माण केली आहे. अतिफ अस्लमचा चाहतावर्ग भारतामध्ये मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांमध्ये युवा वर्गाची संख्या अधिक आहे. आपल्या जादुई आवाजानं अतिफनं चाहत्यांना वेडं केलं आहे. त्यानं गायलेल्या बहुतांशी गाण्याला चाहत्यांची मोठी दाद मिळाली.

मीडिया रिपोर्टनूसार, पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम आता पुन्हा हिंदी सिनेमांमध्ये पार्श्व गायन करण्यासाठी  सज्ज झालाय. अतिफच्या चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच म्हणावा लागेल.  खरंतर अतिफ अस्लम पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तो एका आगामी चित्रपटासाठी गाणे गाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :बॉलिवूडपाकिस्तान