'धुरंधर' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमाचे दोन्ही भाग चांगलेच गाजले. इतकंच नव्हे तर पाकिस्तानी लोकांनी पायरसीच्या माध्यमातून हा सिनेमा चोरुन बघितला. 'धुरंधर' पाहून पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला असणार हे उघड आहे. कारण सिनेमात पाकिस्तानातील ल्यारीचं चित्रण आणि तिथला हिंसाचार दाखवण्यात आला आहे. आता याच सिनेमाला उत्तर म्हणून पाकिस्तानने आता 'मेरा लयारी' (Mera Lyari) चित्रपट बनवला असल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे 'मेरा लयारी' या चित्रपटाची प्रतिष्ठित यूके एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (UK Asian Film Festival) प्रीमियरसाठी निवड करण्यात आली आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा चित्रपट कराचीमधील 'लयारी' या भागावर आधारित आहे. लयारी हा भाग सहसा गुन्हेगारी आणि गँगवॉरसाठी चर्चेत असतो. मात्र, या चित्रपटाच्या निर्मात्यांचा दावा आहे की, 'मेरा लयारी' च्या माध्यमातून या भागाची एक वेगळी आणि सकारात्मक बाजू जगासमोर येईल. याशिवाय तिथली समृद्ध संस्कृती, लोकांचे फुटबॉल आणि बॉक्सिंगबद्दलचे वेड आणि त्यांचा संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मेरा लयारी'ची निवड होणे हे एका पाकिस्तानी सिनेमाचं यश मानलं जातं. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, मुख्य प्रवाहातील सिनेमात अनेकदा लयारीसारख्या भागातील खऱ्या कथा दुर्लक्षित राहतात, त्या या चित्रपटाच्या निमित्ताने जगासमोर येतील. महोत्सवातील स्क्रीनिंगनंतर हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या प्रतिसादामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Web Summary : Following 'Dhurandhar's' portrayal of Lyari's violence, Pakistan releases 'Mera Lyari'. Selected for UK Asian Film Festival, it aims to present Lyari's positive aspects, culture, and struggles, countering negative perceptions. The film will soon be released in theaters.
Web Summary : 'धुरंधर' में ल्यारी की हिंसा के चित्रण के बाद, पाकिस्तान ने 'मेरा ल्यारी' रिलीज की। यूके एशियन फिल्म फेस्टिवल के लिए चयनित, इसका उद्देश्य ल्यारी के सकारात्मक पहलू, संस्कृति और संघर्ष को पेश करना, नकारात्मक धारणाओं का मुकाबला करना है। फिल्म जल्द ही सिनेमाघरों में रिलीज होगी।