Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो ! नेहा कक्करने शेअर केला बाथरूममधला फोटो?, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 14:56 IST

नेहा कक्करचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

बॉलिवूडची गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे बऱ्याचदा ती चर्चेत येत असते. आता तिने एक फोटो शेअर केला आहे,जो चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. हे फोटो पाहून चाहते आणि तिचा नवरा रोहनप्रीत सिंगही तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाला आहे.

नेहा कक्करने तिचे तीन फोटो पोस्ट केले आहेत, त्यामध्ये ती बाथरूममध्ये बसलेली दिसत आहे. नेहा बाथटबच्या काठावर बसून स्माईल करत आहे. नेहाने पांढरा बाथरोब आणि बाथरूम फ्लॅट घातला आहे. या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.नेहा कक्करने फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिले की, 'गुड मॉर्निंग... मी आंघोळ केली आहे, दिवसाची सुरुवात सकारात्मक चहाने करा.' 

नेहा कक्करच्या या फोटोने चाहत्यांनाच नाही तर रोहनप्रीत सिंगलाही भुरळ घातली आहे. त्यानेदेखील या फोटोवर कमेंट करत लिहिले की, 'अहं अहं .. वॉव, अरे मी म्हणालो तू किती सुंदर आहात.'

नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्करनेही तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे. टोनीने म्हटले की, 'किती सुंदर.'  नेहाचे चाहतेदेखील तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे नेहाने शेअर केलेल्या या फोटोमुळे तिला ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :नेहा कक्कर