बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने आपल्या करिअरची सुरूवात अॅक्शन चित्रपटांनी केली होती. अक्षयच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचे अपार प्रेम लाभले. काळानुसार, अक्कीने अॅक्शनसोबतच फॅमिली ड्रामा चित्रपटांची निवड केली. पण अद्यापही चाहत्यांना अक्षयचा अॅक्शन अवतारचं अधिक भावतो. चाहते त्याला फुल ऑन अॅक्शन अवतारात बघू इच्छितात. पण तूर्तास तरी अशा चाहत्यांना निराश करणारी एक बातमी आहे. होय, अक्षयने साऊथ सुपरस्टार अजीतच्या ‘वीरम’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता. ही बातमी ऐकून अक्षयच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण ताजी खबर मानाल तर ‘वीरम’च्या हिंदी रिमेकचे काम थंडबस्त्यात गेले आहे.
OMG! अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा रखडला!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 10:04 IST
अद्यापही चाहत्यांना अक्षयचा अॅक्शन अवतारचं अधिक भावतो. चाहते त्याला फुल ऑनअॅक्शन अवतारात बघू इच्छितात. पण तूर्तास तरी अशा चाहत्यांना निराश करणारी एक बातमी आहे.
OMG! अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा रखडला!!
ठळक मुद्दे लवकरच अक्षय रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. रोहित व अक्षयची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे.