Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवभक्तीत रमले पंकज त्रिपाठी, अक्षयच्या लुकने वेधलं लक्ष; 'OMG 2' चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 13:44 IST

'रामायण' फेम अरुण गोविल श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

खिलाडी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) चा टीझर नुकताच रिलीज झाला. भोलेनाथच्या लुकमध्ये अक्षयने सर्वांचं मन जिंकलं आहे. ओएमजी चा पहिला भाग खूप गाजला होता. परेश रावल आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. सिनेमाची मूळ कथाच सिनेमाचा हिरो होती. महत्वाचा संदेश त्यातून देण्यात आला होता. त्यामुळे सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'ओएमजी 2' च्या दुसऱ्या भागाचा टीझर काही तासातच व्हायरल झालाय.

रख विश्वास तू है शिव का दास 

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप होत आहेत. त्यामुळे 'ओएमजी 2' कडून त्याला अपेक्षा आहेत. सिनेमात अक्षय महादेवाच्या लुकमध्ये दिसतोय. १ मिनिट २६ सेकंदाच्या या टीझरमध्ये अक्षयच्या एंट्रीनेच मन जिंकलं आहे. लांब जटा, कपाळी भस्म आणि गळ्यात रुद्राक्ष घालून अक्षयची एंट्री होते. अक्षय आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या अंदाजात दिसत आहे. रख विश्वास तू है शिव का दास! हा अक्षय कुमारचा डायलॉग गाजतोय. 

'ओएमजी 2' मध्ये पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी एकत्र काम करत आहेत. यामी गौतमही सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. वेगळं कथानक आणि उत्तम स्टारकास्टमुळे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा आहे. टीझर सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि प्रेक्षकांच्या आवडतोय. सिनेमात 'रामायण' फेम अरुण गोविल श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांना पुन्हा श्रीरामाच्या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. अमित राय यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

टॅग्स :अक्षय कुमारपंकज त्रिपाठीयामी गौतम