Join us

अक्षय कुमारच्या OMG 2 च्या रिलीजची तारीख पुढे ढकलणार?, समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:37 IST

मीडिया रिपोर्टनुसार अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाऊ शकते.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'OMG 2' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. अमित राय दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेते पंकज त्रिपाठी आणि क्रिती सनॉन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या सुधारित समितीने चित्रपटाला २० कट आणि 'ए' प्रमाणपत्रासह रिलीज करण्याची परवानगी दिली आहे.

फिल्मला ए सर्टिफिकेट देण्याचा अर्थ असा की १८ वर्षांपेक्षा कमी वयातील मुलं सिनेमागृहात जाऊन फिल्म बघू शकणार नाहीत. त्यामुळे अक्षय कुमार आणि फिल्मचे मेकर्स नाराज आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाऊ शकते. निर्मात्यांना या समितीने सुचविलेल्या बदलांविरोधात लढा देऊ इच्छित आहेत. चित्रपटाची योग्य प्रसिद्धी आम्हाला करायची आहे.

समितीच्या निर्णयावर निर्माते खूश नाहीत आणि 'OMG 2' ला देण्यात आलेल्या 'A' प्रमाणपत्रावरही ते खूश नाहीत, असा अहवाल यापूर्वी आला होता. कारण याचा परिणाम चित्रपटाच्या संकल्पनेवर होईल, असे निर्मात्यांना वाटते. याशिवाय लैंगिक शिक्षणाचा हा विषय सर्व वयोगटातील लोकांनी चित्रपटात पाहावा, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.  'OMG 2' हा 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'OMG' चित्रपटाचा सिक्वेल आहे. OMG चित्रपटात परेश रावल यांनी नास्तिकाची भूमिका साकारली होती, तर अभिनेता अक्षय कुमार भगवान कृष्ण बनला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता 'OMG 2' मध्ये परेश रावलची जागा अभिनेता पंकज त्रिपाठीने घेतली असून अक्षय यावेळी महादेवाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री क्रिती वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'OMG 2' या चित्रपटाचा आतापर्यंत फक्त टीझर रिलीज झाला आहे, चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. 

 

टॅग्स :अक्षय कुमारपंकज त्रिपाठी