बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार सध्या केसरी चित्रपटामुळे चर्चेत आहे. होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला केसरी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १२५ कोटींहून जास्त कमाई केली आहे. मात्र एका घटनेमुळे अक्षय कुमार चर्चेत आला आहे.
अक्षय कुमार एका अवॉर्ड शोमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने पांढऱ्या रंगाच्या शर्टवर ब्लेझर परिधान केला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि त्याची सासू डिंपल कपाडिया उपस्थित होती. अक्षय कुमार स्टेजवर गेला तेव्हा त्याच्या छातीतून अचानक रक्त येऊ लागले. त्याला खूप दुखत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून जाणवले. हे पाहून ट्विंकल खन्ना व डिंपल कपाडिया घाबरले. ट्विंकल खन्ना व डिंपल कपाडियाला टेन्शनमध्ये पाहून अक्षय कुमारने परिस्थितीला सांभाळून घेतले आणि तो अचानक हसू लागला. अक्षयने सांगितले की, आज एप्रिल फुल डे आहे आणि सगळ्यांना एप्रिल फुल बनवले. हे समजल्यावर डिंपल व ट्विंकलच्या जीवात जीव आला.