Join us
Daily Top 2Weekly Top 5

O Romeo X Review: शाहिदचा करिअरमधील बेस्ट परफॉर्मन्स, तर नाना पाटेकर ठरले 'गेमचेंजर'; प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:32 IST

'ओ रोमियो' हा गँगस्टर ड्रामा असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शो नंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या आहेत

शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज ही जोडी जेव्हा एकत्र येते, तेव्हा प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात.  'कमीने', 'हैदर' आणि 'रंगून'नंतर ही जोडी आता 'ओ रोमियो' या गँगस्टर ड्रामाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शो नंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या आहेत.

ट्विटरवर (X) अनेक चाहत्यांनी शाहिद कपूरच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. प्रेक्षकांच्या मते, शाहिदने 'हुसैन उस्तारा' या गँगस्टरच्या भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, आक्रमक संवाद आणि भावुक दृश्यात त्याने केलेला अभिनय, यामुळे 'ओ रोमियो' हा शाहिदच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. एका युजरने याला 'ब्लॉकबस्टर' म्हणत ४.५ स्टार दिले आहेत.

तृप्ती डिमरी आणि तगडी स्टारकास्ट शाहिदसोबतच अभिनेत्री तृप्ती डिमरी हिच्या कामाचेही कौतुक होत आहे. तिच्या भूमिकेतील निरागसता आणि सूडाची भावना प्रेक्षकांना भावली आहे. तसेच नाना पाटेकर, फरिदा जलाल आणि विक्रांत मेस्सी यांच्या विशेष उपस्थितीने चित्रपटाची रंगत वाढवली आहे. विशेषतः फरिदा जलाल यांच्या तोंडी असलेले काही शिवराळ संवाद आणि नाना पाटेकर यांची दमदार शैली प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरली आहे.

काही प्रेक्षकांना चित्रपटाची पटकथा संथ आणि गुंतागुतीची असल्याचे म्हटले आहे. एका युजरने याला "२०२६ मधील सर्वात कमकुवत चित्रपटांपैकी एक" असे म्हणत चित्रपटातील गाणी आणि कथेवर टीका केली आहे. विशाल भारद्वाज यांची दिग्दर्शन शैली काही प्रेक्षकांना खूप 'क्लासिक' वाटली, तर काहींसाठी ती कंटाळवाणी ठरली आहे.

सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चांगली कमाई केली आहे. ३ कोटींहून अधिक रुपयांची तिकीट विक्री पहिल्याच दिवशी झाली असून, विकेंडला हा आकडा मोठा असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : O Romeo Review: Shahid Kapoor shines; audience reactions mixed.

Web Summary : Shahid Kapoor's performance in 'O Romeo' is praised, with mixed audience reactions on the film's plot. Tripti Dimri is also lauded, while Nana Patekar's presence is noted. Advance bookings show promising numbers.
टॅग्स :नाना पाटेकरशाहिद कपूरतृप्ती डिमरीफरिदा जलालबॉलिवूड