शाहिद कपूरचा (shahid kapoor) बहुप्रतिक्षित ठरलेला ओ रोमियो हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यामुळे या सिनेमाने रिलीजच्या सहाव्या दिवशी किती कमाई केली ते पाहुयात.
विशाल भारद्वाज दिग्दर्शत 'ओ रोमियो' या सिनेमासोबत 'तू या मैं' हा सिनेमादेखील रिलीज झाला. या सिनेमात शनाया कपूर आणि आदर्श गौरव झळकले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमांमध्ये टक्कर झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच एका स्टेबल ओपनिंग विकेंडनंतर 'ओ रोमियो'च्या कमाईत घट झाली आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ४० कोटींची कमाई केली होती. मात्र, आता या आकड्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही.
'ओ रोमियो'ने पहिल्या दिवशी ८.५० कोटींची कमाई केली होती. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे १२.६५ कोटी आणि ९ कोटींची कमाई केली. याच सिनेमाने चौथ्या दिवशी ४.८५ कोटींचा गल्ला जमवला. तर, पाचव्या दिवशी ५. २५ कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवशी फक्त ३ ५ कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान, ओ रोमियोच्या सहाव्या दिवसाची कमाई धरुन आता या सिनेमाची एकूण कमाई ही फक्त ४३. ८५ कोटी रुपये इतकीच झाली आहे. तर, वर्ल्डवाइड या सिनेमाने ६७.१५ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा जवळपास १२५ ते १३० कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आला आहे.
Web Summary : Shahid Kapoor's 'O Romeo' faces competition but earned ₹43.85 crore in India and ₹67.15 crore worldwide after six days, with day six bringing in ₹3.5 crore.
Web Summary : शाहिद कपूर की 'ओ रोमियो' को टक्कर मिली, लेकिन छह दिनों में भारत में ₹43.85 करोड़ और दुनिया भर में ₹67.15 करोड़ कमाए, छठे दिन ₹3.5 करोड़ की कमाई हुई।