Join us

Nyasa Devgan : काजोलने लेकीसोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; नेटकरी म्हणतात, 'ही तर नेहमीच नशेत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 15:25 IST

नुकतेच झालेले ख्रिसमस सेलिब्रेशन असो किंवा नवीन वर्षाचे स्वागत असो, न्यासाने तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले. न्यासा आई काजोलसोबत पुन्हा दिसली आहे पण कोणत्या पार्टीत नाही तर मंदिरात.

अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोलची (Kajol) लेक न्यासा देवगण (Nyasa Devgan) सध्या भलतीच चर्चेत आहे. तिचा बदललेला लुक एकंदरच झालेला कायापालट बघून नेटकरी तिला ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत. नुकतेच झालेले ख्रिसमस सेलिब्रेशन असो किंवा नवीन वर्षाचे स्वागत असो, न्यासाने तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले. पण आता न्यासा आई काजोलसोबत पुन्हा दिसली आहे पण कोणत्या पार्टीत नाही तर मंदिरात.

आई काजोलबरोबर न्यासाने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

सोशल मीडियावर नुकताच न्यासाचा एक व्हिडिओ आला आणि ती पुन्हा एकदा चर्चेता विषय बनली. सध्या पापाराझी (Paparazi) हे स्टारकिड्सला सारखंच कॅमेऱ्यात कैद करत असतात. मात्र अजून काही स्टारकिड्स कॅमेऱ्यासमोर कंम्फर्टेबल नसतात. त्यातलीच एक काजोलची लाडकी लेक न्यासा. आज सकाळीच काजोल आणि लेक न्यासा सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दाखल झाल्या. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर पापाराझींनी दोघींभोवती गराडा घातला. यावेळी न्यासा मात्र काहीशी नर्व्हस झाली. चेहऱ्यावर किंचीतही हास्य न दाखवता ती थेट गाडीत बसलेली दिसली.

न्यासाने यावेळी पांढरा पंजाबी ड्रेस घातला होता. आज इतक्या व्यवस्थित कपड्यांमध्ये पाहिल्यावर नेटिझन्सने तिला ट्रोल केलेच. 'काही दिवसांपूर्वी बोल्ड लुक मध्ये दिसल्यानंतर आता आई बाबांनी पीआर स्टंटसाठी मुलीला मंदिरात आणले वाटतं' अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर एकाने पू बनी पार्वती अशीही कमेंट केली आहे. नववर्षाच्या पार्टीनंतर घरी चांगलेच बोलणे खाल्लेले दिसत आहेत अशीही कमेंट करत नेटकऱ्यांनी न्यासाला ट्रोल केले आहे. 

20 एप्रिल 2003 रोजी जन्मलेली काजोल व अजयची लेक न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिकतेय. न्यासाचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. सध्या ती तिचा मित्र ओरीसोबतच्या फोटोंमुळे भलतीच चर्चेत आहे. 

टॅग्स :सोशल मीडियाकाजोलअजय देवगणट्रोल