1985 मध्ये रिलीज झालेला 'आखिरी दांव' हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री नूतन रातोरात सुपरस्टार झाली. तिच्यावर चित्रीत झालेली गाणी त्याकाळी तुफान गाजली. इतकंच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे अनेक तरुण भाळले. मात्र, अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला एकेकाळी कुरूप म्हणून हिनवलं गेलं होतं.
नूतन यांनी जवळपास ४ दशके बॉलिवूडवर राज्य केलं. या ४ दशकांमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. विशेष म्हणजे प्रसिद्ध, लोकप्रियता, ग्लॅमरस लाइफ इतकं सगळं मिळवूनही या अभिनेत्रीला मात्र लहानपणी अनेकांचे टोमणे सहन करावे लागले होते. 'तू छान दिसत नाही', 'इतरांपेक्षा वेगळी दिसते' असं सतत त्यांना ऐकावं लागलं होतं. एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वत: याविषयीचा खुलासा केला होता.
''मला लहानपणापासून सिनेमात काम करायची फार इच्छा होती. पण, मी लहान असतांना मला लोकांनी सतत या गोष्टीची जाणीव करुन दिली की मी छान दिसत नाही. माझ्या आईच्या मैत्रिणी घरी यायच्या त्या कायम माझ्या दिसण्यावरुन बोलायच्या. तुझी मुलगी तुझ्या इतकी छान नाही दिसत असं त्या म्हणायच्या. त्यांच्या या बोलण्यामुळे मला फार वाईट वाटायचं. पण, माझ्या आईने त्यावेळी माझी समजूत काढली होती'', असं नूतन म्हणाल्या होत्या.
पुढे त्या म्हणतात, "त्यावेळी माझी आई म्हणाली होती. या सगळ्यांचं बोलणं तू नकारात्मकदृष्टीने घेऊ नकोस. त्याच्याकडे पॉझिटिव्ह अॅगलने बघ. मी मोठी झाल्यावर माझा रंग आणि रुप दोन्हींच्या बाबतीत मी खूप सुंदर दिसेन हे त्यांना सांग. आणि,मी सुद्धा माझ्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.''
दरम्यान, नूतन यांची आई शोभना समर्थ यांनी नूतन यांच्या आत्मविश्वास वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी नूतन यांनी शिक्षणासाठी विदेशात पाठवलं. तसंच त्यांचं वजन कमी करण्यासाठीही खूप मेहनत घेतली. विशेष म्हणजे आपल्या मुलीला सिनेमात लॉन्च करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आणि, त्याचमुळे नूतन यांनी इंडस्ट्री गाजवली. नूतन यांनी बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यांनी 'नल दमयंती' या सिनेमातून इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले.
Web Summary : Nutan, once deemed 'ugly,' reigned over Bollywood for four decades, delivering numerous hits. Despite early criticism about her looks, she transformed her perceived flaws into strengths, achieving immense fame and success with her talent and beauty.
Web Summary : कभी 'बदसूरत' समझी जाने वाली नूतन ने चार दशकों तक बॉलीवुड पर राज किया, कई हिट फिल्में दीं। अपनी सुंदरता और अभिनय से उन्होंने खूब नाम कमाया। शुरुआती आलोचनाओं को ताकत बनाकर सफलता हासिल की।