Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आदिपुरुष'मध्ये दीपिका पादुकोण नाही तर ही अभिनेत्री बनणार सीता, रामाच्या भूमिकेत दिसणार प्रभास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 15:23 IST

'आदिपुरुष'मध्ये सीताच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती.

बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'आदिपुरुष'ची संपूर्ण कास्ट फायनल झाली आहे. या चित्रपटात प्रभू श्री रामांच्या भूमिकेत प्रभास तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. आतापर्यंत सीताच्या भूमिकेत कोण अभिनेत्री फायनल झाली आहे हे समजू शकलेले नव्हते. मात्र आता याचा उलगडा झाला आहे.

पहिल्या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणच्या नावाची चर्चा होती पण आता ही भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला मिळाली आहे. आता सीतेच्या भूमिकेत कृति सेनॉन पहायला मिळणार आहे. चित्रपट दिग्दर्शक ओम राउतला पहिले दीपिका पादुकोणला सीतेच्या भूमिकेसाठी घ्यायचे होते पण ती आधीच प्रभास सोबत दिग्दर्शक नाग अश्विनी यांच्या चित्रपटात काम करते आहे. त्यामुळे निर्मात्यांना एकच जोडी प्रेक्षकांसमोर पुन्हा आणायची नव्हती.

त्यामुळे चित्रपटात सीतेची भूमिका कृति सेनॉनला मिळाली. तर यापूर्वी असे वृत्त आले होते की चित्रपटात लक्ष्मणच्या भूमिकेसाठी सोनू की टीटू की स्वीटी फेम सनी सिंगसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच चित्रपटाच्या संपूर्ण कास्टबद्दल समजणार आहे. आदिपुरूष चित्रपट हिंदू ग्रंथ रामायणावर आधारीत आहे आणि हा एक भव्य सिनेमा असणार आहे.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमाचं शूटींग पुढील महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. आणि एकदाच शूटींग पूर्ण केलं जाईल. अशीही माहिती समोर आली की, या सिनेमाचं शूटींग क्रोमावर स्टुडीओत होईल. यात व्हिएफएक्सच्या माध्यमातून स्पेशल इफेक्ट्स टाकले जातील.

टॅग्स :दीपिका पादुकोणक्रिती सनॉन