Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोरा फतेही संकटात! सोडावा लागणार भारत? कायदेशीर वादात अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:55 IST

१० वकिलांच्या एका गटाने नोराचे 'वर्क परमिट' रद्द करण्याची मागणी केली आहे.

बॉलिवूडची 'डान्सिंग क्वीन' नोरा फतेही आणि संजय दत्त यांचं 'केडी द डेविल' सिनेमातील 'सरके चुनर तेरी सरके'  हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. गाण्यातील अश्लील शब्द आणि बोल्ड हुक स्टेप्सचा भडीमार यामुळे गाण्यावर आक्षेप घेतला गेला आहे. मात्र, आता हा वाद केवळ ट्रोलिंगपुरता मर्यादित न राहता थेट नोराच्या भारतातील वास्तव्यापर्यंत पोहोचला आहे. १० वकिलांच्या एका गटाने नोराचे 'वर्क परमिट' रद्द करण्याची मागणी केली आहे.

नोरा फतेही एका मोठ्या कायदेशीर वादात अडकली आहे. 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, वकिलांच्या एका गटाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेत नोरा फतेहीचे भारतातील कामाचे परमिट रद्द करून तिला देशाबाहेर हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. नोरा भारतातील वास्तव्याच्या विशेषाधिकाराचा गैरवापर करत असून, ती अश्लील आणि भारतीय संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या आशयाचा प्रसार करत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीत 'परदेशी नागरिक कायदा, १९४६' (Foreigners Act, 1946) चा संदर्भ देण्यात आला आहे. वकिलांच्या मते, जर एखाद्या परदेशी नागरिकाचे वर्तन सार्वजनिक सभ्यता किंवा सुव्यवस्थेसाठी घातक ठरत असेल, तर सरकारला त्यांच्यावर कठोर कारवाईचे अधिकार आहेत. या संदर्भात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडेही अधिकृत तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

नोराचे स्पष्टीकरण आणि गाण्यावर बंदीवाढता वाद पाहून 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणे सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना नोरा फतेहीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. तिने म्हटले की, "या गाण्यातील हिंदी ओळींबद्दल मला पूर्वकल्पना नव्हती, त्यामुळे माझ्यावर होणारे ट्रोलिंग चुकीचे आहे". दरम्यान, गाण्याच्या गीतकारानेही माफी मागितली असून, कन्नड शब्दांचे हिंदीत चुकीचे भाषांतर झाल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, आता वकिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नोराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nora Fatehi in trouble: Facing deportation over controversial song?

Web Summary : Nora Fatehi faces legal trouble over the song 'Sirke Chunar Teri Sirke'. A petition seeks her deportation, alleging vulgarity and misuse of her work permit. The song has been removed, with Fatehi and the lyricist apologizing.
टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूड