Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोरा फतेहीच्या डान्सने सर्वांना केले क्रेझी, व्हिडिओत एक नाही तर तब्बल पाच दिसल्या नोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:18 IST

नोराचा हा व्हिडिओ होतोय खूप व्हायरल

दिलबर दिलबर म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री नोरा फतेही तिच्या दिलखेचक डान्ससाठी ओळखली जाते. तसेच नोरा बऱ्याचदा सोशल मीडियावरील व्हिडिओ व फोटोंमुळे चर्चेत येत असते. ती फक्त मोठ्यांचीच नाही तर बच्चेकंपनीची देखील फेव्हरिट आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत. तिचे सर्वच डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. पण नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे जो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 11 लाखांपेक्षा जास्त व्हयुज आहेत.

नोराने नुकतेच टिकटॉकवर पदार्पण केले असून तिने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करून नोराने लिहिले की, वॉव! खूप साऱ्या नोरियाना. तर हा आहे माझा टिक टॉक डेब्यू मला itsnoriana वर फॉलो करा.' नोराचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. कारण यात एक नोरा नाही तर तब्बल पाच नोरा पहायला मिळत आहेत.

अभिनेत्री नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने तिच्या डान्स स्टाइलमुळे बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

तिने आतापर्यंत  'दिलबर', 'कमरिया', 'साकी साकी', 'एक तो कम जिंदगानी' आणि 'गर्मी सॉन्ग' या गाण्यांवर डान्स केला आहे. तिची ही सर्वच गाणी लोकप्रिय झाली.

तसेच नोराने स्ट्रीट डान्सर थ्रीडीमधून आपल्या डान्स व अभिनयाने रसिकांचे मन पुन्हा एकदा जिंकले आहे.

टॅग्स :नोरा फतेहीस्ट्रिट डान्सर 3 डी