Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...! व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 20:25 IST

जाणून घ्या काय आहे प्रकरण

ठळक मुद्देशोमध्ये नोरा मलायका अरोराच्या जागी जज म्हणून आली आहे.

बॉलिवूडमध्ये डान्स आणि अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसतेय. तूर्तास या शोचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची पुरती सटकलीय. होय, या व्हिडीओत कोरिओग्राफर टेरेंस लुईस नोराला कथितरित्या आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसतोय. या व्हिडीओनंतर टेरेंस लुईस प्रचंड ट्रोल होतोय.दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे. हा व्हिडीओ 12 सप्टेंबरला चॅनलवर प्रसारित झालेल्या एपिसोडचा असल्याचे मानले जात आहे. यात ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा गेस्ट म्हणून आले होते. शोमध्ये तिन्ही जज गीता कपूर, नोरा व टेरेंस हे शत्रुघ्न व पूनम यांचे अनोखे स्वागत करतात. व्हिडीओत दिसते त्यानुसार, याचदरम्यान टेरेंसने नोराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करतो. नोरा यावर काहीही रिअ‍ॅक्ट करत नाही.शोमध्ये नोरा मलायका अरोराच्या जागी जज म्हणून आली आहे. आधी नोराला दोन एपिसोड जज करण्यासाठी साईन केले गेले होते. मात्र मलायकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिचा करार आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला.

नेटक-यांनी घेतला टेरेंसचा क्लासतूर्तास नोरा व टेरेंसच्या या व्हिडीओवर नेटक-यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती टेरेंस, असे एका युजरने लिहिले आहे. अर्थात काही जणांनी टेरेंसचे समर्थनही केले आहे. कदाचित नोराला खाली वाकण्यासाठी इशारा देताना असे केले असावे, असे काहींनी म्हटले आहे. 

काहींनी मात्र यानिमित्ताने टेरेंसवर सडकून टीका केली आहे.

 ‘आधी मला वाटले, चुकून टेरेंसचा हात लागला असावा. पण चुकून कोणाला हात लागला तर आपण माफी मागतो. पण असे काहीही झाले नाही,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. अन्य एका युजरने व्हिडीओकडे लक्ष वेधले आहे. ‘प्रणाम करताना दोन्ही हात एकत्र मुव्ह करतात. हात सरळ यायला हवेत़ पण टेरेन्सचा हात मागे का गेला?’ असा सवाल एका युजरने केला आहे.

टॅग्स :नोरा फतेही