Join us

नोरा फतेहीने 'कमरियाँ' गाण्यावर ठुमके लावताच, फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 16:43 IST

'दिलबर', 'कमरिया',  'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' या गाण्यांनी नोरा फतेहीने बॉलिवूड जगात आपले एक वेगळे स्थान निर्माण केली आहे. 

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. नोराचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. सोशल मीडियावरही ती सक्रीय असते. आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर करत असते. ती आपल्या फॅन्सना कधीही निराश करत नाही. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच व्हिडीओत सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात. तिचा प्रत्येक व्हिडीओ फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. 

नुकताच नोरा फतेहीचा आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ''कमरिया'' गाण्यावर ठेका धरताना दिसते.व्हिडिओमध्ये नोरा फतेहीची डान्स मुव्हज आणि तिच्या अदा पाहण्यासारखी आहे. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ तिच्या फॅन्स पेजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, नोराचा हा व्हिडीओ आतापर्यंत 44 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

मलायका अरोराच्या कोविड -१९ पॉझिटिव्हनंतर अभिनेत्री नोरा फतेहीने भारताच्या बेस्ट डान्सर शोमध्ये स्थान मिळवले. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटात नोरा डान्सने रसिकांची मनं जिंकणार आहे.  'दिलबर', 'कमरिया',  'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' या गाण्यांनी नोरा फतेहीने बॉलिवूड जगात आपले एक वेगळे स्थान निर्माण केली आहे. 

नोरा फतेहीच्या 'एक तो कम जिंदगानी' गाण्याला झाले १ वर्ष पूर्ण, आठवणींना दिला उजाळा

तिच्या एक तो कम जिंदगानी या गाण्याला एक वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने तिने आता या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने या गाण्याच्या रिहर्सल व्हिडिओसोबत फोटोदेखील इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. 'सत्यमेव जयते' सिनेमात नोरा फतेहीने सुष्मिता सेनचा सुपरहिट 'दिलबर गाण्याच्या रिक्रेअट व्हर्जनमध्ये डान्स केला होता. हे गाणेही प्रचंड हिट ठरले.रसिकांनीही गाण्याचे आणि नोराचे खूप कौतुक केले.यानंतर नोराने अनेक सिनेमांमध्ये आयटम डान्स केले आहेत. त्यापैकी मरजावां सिनेमातील गाणं एक तो कम जिंदगानीदेखील खूप गाजले होते आणि या गाण्याला आता एक वर्षे पूर्ण झाले आहे.

टेरेंस लुईसने नोरा फतेहीला चुकून केला होता स्पर्श? कोरिओग्राफरने सांगितले त्या आक्षेपार्ह व्हिडीओमागचे सत्य

नोरा फतेही काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची पुरती सटकली होती. होय, या व्हिडीओत कोरिओग्राफर टेरेंस लुईस नोराला कथितरित्या आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत होता. मग काय नेटक-यांनी टेरेंस लुईसला जबरदस्त ट्रोल केले होते. हे ट्रोलिंग आणि त्या व्हिडीओत आता टेरेंसने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली होती.

टॅग्स :नोरा फतेही