Join us

ना सिनेमा, ना जाहिरात...आलिशान लाईफस्टाईलसाठी करिष्मा काय करतेय माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 14:32 IST

एक सिनेमा करत मालामाल होणारी करिश्माचे आयुष्य आता फार बदलले आहे. पूर्वीसारखे राहिलेले नाही. लग्नानंतर जबाबदारी आणि काम असा समतोल साधत ती तिचे आयुष्य एन्जॉय करताना दिसते.

सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य ऐशोआरामाचं असतं. त्यांची जीवनशैली फारच उच्च असते असं आपण पाहतो. त्यातच एखादा सिनेमा सुपरहिट झाला, त्या सिनेमावर पुरस्कारांचा वर्षाव झाला की त्या सिनेमातील कलाकाराचं आयुष्यच पालटतं हेही आपण वारंवार पाहिलंय. त्यामुळे अभावाने त्यांना लक्झरी लाइफस्टाइल मेंटन करावीच लागते. मात्र बॉलिवूडमध्ये कोणताही सिनेमा न करता कोणत्या मार्गाने सेलिब्रेटी पैसे कमावतात,. त्यांचा घरखर्च कसा चालतो असे अनेक प्रश्न आता करिश्मा कपूरबाबतही चाहत्यांना पडतात.

90 च्या दशकातील अभिनेत्रींच्या यादीत करिश्मा कपूर आघाडीची अभिनेत्री मानली जाते. एकेकाळी सा-यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी करिश्माने  अनेक रोमँटिक सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. गेल्या काही वर्षापासून सिनेमापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह संपर्कात असते. 

एक सिनेमा करत मालामाल होणारी करिश्माचे आयुष्य आता फार बदलले आहे. पूर्वीसारखे राहिलेले नाही. लग्नानंतर जबाबदारी आणि काम असा समतोल साधत ती तिचे आयुष्य एन्जॉय करताना दिसते. सध्या फक्त 'मेंटलहूड' या एकच वेब सिरीजमध्ये ती झळकते. असं असलं तरी कमाईचे साधन काय असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. 

करिश्मा उत्तम अभिनेत्री असल्यासोबत एक उत्तम बिझनेसवुमनही आहे.  घराचा चरितार्थ चालवण्यासाठी ती वेगवेगळे उद्योग करत असल्याची माहिती मिळते. वेगेवेगळ्या ब्रँडमध्येही तिने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला चांगले उत्पन्न मिळतं.  इतकेच नाही तर पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मिळालेल्या पोटगीतून ती आजही आलिशान आयुष्य जगते.

टॅग्स :करिश्मा कपूर