Join us
Daily Top 2Weekly Top 5

असं आहे नीता अंबानी यांचं मेकअप रुम; समोर आला अँटिलियामधील खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 16:45 IST

नुकतेच नीता अंबानी यांच्या मेकअप रुमचा व्हिडीओ समोर आला आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नीता अंबानी कधी त्यांच्या समाजकार्यमुळे आणि हटके स्टायलिश लूकसाठी ओळखल्या जातात. नुकतेच नीता अंबानी यांनी त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा केला. नुकतेच नीता अंबानी यांच्या मेकअप रुमचा व्हिडीओ समोर आला आहे.

मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने नीता अंबानी यांचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. परफ्युम्स, फोटो फ्रेम, मेकअपचे सामान, मोठा आरसा असं दिसत आहे. शिवाय व्हिडीओमध्ये नीता अंबानी यांची काही महिला आरती करताना आणि शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर काही जणी नीता यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतानाही पाहायला मिळत आहेत.

नीता अंबानी आजही या वयात खूपच सुंदर दिसत असून सौंदर्याच्या बाबतीत त्यांनी अनेक तरुण अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अखंड कार्यरत आहेत. नीता अंबानी यांनी मुंबईच्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. याशिवाय नीता अंबानी या भरतनाट्यमच्या प्रशिक्षित नृत्यांगनाही आहेत. 

टॅग्स :नीता अंबानीबॉलिवूडसेलिब्रिटी