Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hotness Alert! निधी अग्रवालने शेअर केला बाथरूम सेल्फी, आतापर्यंत मिळाले ५ लाख लाइक्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 10:44 IST

निधी अग्रवालने तिचा एका बाथरूम सेल्फी शेअर केला आहे. निधीचा हा सेल्फी  सध्या तिच्या फॅन्समध्ये चांगलाच गाजतोय. यात ती आरशासमोर पोज देताना दिसत आहे.

अभिनेत्री निधी अग्रवाल ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते आणि सोशल मीडियावर आपले एकापेक्षा एक भारी फोटोज शेअर करत असते. जरी ती फार मोठ्या सिनेमांमध्ये दिसली नसली तरी तिची फॅन फॉलोईंग चांगलीच आहे. आता तिने तिचा एका बाथरूम सेल्फी शेअर केला आहे. निधीचा हा सेल्फी  सध्या तिच्या फॅन्समध्ये चांगलाच गाजतोय. यात ती आरशासमोर पोज देताना दिसत आहे.

निधी अग्रवालच्या या बाथरूम सेल्फीला ५ लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. निधी अग्रवाल हे तेलुगू सिने इंडस्ट्रीतील एक मोठं आणि लोकप्रिय नाव आहे. तिने सांगितले की, ती नव्या प्रोजेक्टसाठी आता तमिळ भाषा शिकत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ती ऑनलाईन क्लासेस घेत आहे. जेणेकरून तमिळ भाषेवर तिची चांगली कमांड व्हावी.

निधी अग्रवाल अभिनेता टायगर श्रॉफच्या 'मुन्ना मायकल' सिनेमात दिसली होती. या सिनेमातून तिने बॉलिवूड डेब्यू केलं होतं. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. निधी 'सव्यासाची', 'मिस्टर मजनूं' आणि 'iSmart Shankar' सारख्या गाजलेल्या तमिळ सिनेमात दिसली आहे. 

टॅग्स :बॉलिवूडTollywoodसोशल व्हायरल