Join us

Video: उदित नारायण यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; सेल्फी घेणाऱ्या फॅनच्या गालावर किस केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:25 IST

उदित नारायण यांनी काहीच दिवसांपूर्वी एका कॉन्सर्टमध्ये चाहतीला किस केल्याचा व्हिडीओने वाद झाला. हा वाद थंड होतोय तोच उदित यांचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय (udit narayan)

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक म्हणजे उदित नारायण. गेल्या काही दिवसांपूर्वी एका कॉन्सर्टमध्ये उदित नारायण (udit narayan) यांनी एका चाहतीला लिप किस केलं त्यामुळे प्रचंड वाद झाला. अनेकांनी उदित यांच्या वर्तनावर टीकाही केली. परंतु उदित (udit narayan new video) यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नाही असं म्हटलं. हे प्रकरण शांत होतंय तोच उदित यांचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत उदित पुन्हा एकदा त्यांच्या फॅन्सला किस करताना दिसून आले. (udit narayan kiss controversy)

उदित नारायण यांचा नवीन व्हिडीओ

सोशल मीडियावर उदित नारायण यांच्या एका कॉन्सर्टमधला व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत उदित नारायण गाता गाता खाली गुडघ्यावर बसलेले दिसतात. त्यांच्या फिमेल फॅन्स त्यांच्यासोबत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सेल्फी काढण्यासाठी स्टेजजवळ येतात. उदितजी प्रत्येकाच्या फोनमध्ये बघत फॅन्सला किस करताना दिसतात. व्हायरल व्हिडीओत हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या फिमेल फॅनसोबत उदित यांनी सेल्फी काढला. पुढे तिच्या गालावर किस करुन तिला लीप किसही केलं. उदित यांचा नवीन व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

उदित यांच्या नवीन व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

उदित नारायण यांचा नवीन व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी व्हिडीओवर त्यांच्या कमेंट्स नोंदवल्या आहेत. 'उदित नारायण इमरान हाश्मीचे गॉडफादर आहेत', 'ती बिचारी फक्त सेल्फी घ्यायला आली होती', अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी उदित यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. काही दिवसांपूर्वी उदित यांनी याप्रकरणी मत व्यक्त केलं होतं की, "फॅन्स माझ्यावर प्रेम करतात. मी त्यांच्यावर जास्त प्रेम करतो. माझं मन एकदम साफ आहे." उदित यांच्या नव्या व्हिडीओमुळे काय वादंग माजणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

टॅग्स :उदित नारायणबॉलिवूड