Join us

'फुले' सिनेमाची नवी रिलीज डेट आली समोर, करण्यात येणार हे मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:35 IST

'फुले' सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. याशिवाय सेन्सॉरने सिनेमात काही बदल करण्यास सांगितले आहे (phule)

'फुले' सिनेमाची (phule movie) रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. ब्राम्हण महासंघाने घेतलेल्या आक्षेपामुळे आणि सेन्सॉरने सुचवलेल्या काही बदलांमुळे 'फुले' सिनेमाची रिलीज डेट दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली.  याशिवाय सेन्सॉरने 'फुले' सिनेमा रिलीज करण्यापूर्वी मेकर्सना काही बदल करण्यास सांगितले आहेत. 'फुले' सिनेमाची नवी रिलीज डेट काय आणि सेन्सॉरने सिनेमाविषयी कोणते बदल सुचवले आहेत, जाणून घ्या.

'फुले' सिनेमात करण्यात येणार हे बदल

मीडिया रिपोर्टनुसार सेन्सॉरने 'फुले' सिनेमात जे बदल सुचवले आहेत ते पुढीलप्रमाणे

  • सिनेमात जातीवर्गाबद्दल जो व्हॉईसओव्हर येतो त्यातील 'मांग', 'महार', 'पेशवाई' हे शब्द काढायला सांगितले आहेत
  • स्पेशल इफेक्टच्या माध्यमातून झाडू घेऊन जाणाऱ्या माणसाचे दृश्य काढायला सांगून त्याऐवजी सावित्रीबाईंवर शेणाचे गोळे फेकणारी मुलं हा सीन ठेवण्यात आला आहे.
  • याशिवाय 'जहाँ शूद्रो को झाडू बांधकर चलना चाहिए', हा डायलॉग डिलिट करायला सांगितला आहे. त्याऐवजी 'क्या यही हमारी... सबसे दूरी बनाके रखनी चाहिए', हा संवाद ठेवण्यात आला आहे.
  • '३००० साल पुरानी गुलामी..' हा संवाद काढायला सांगून त्याजागी 'कई साल पुरानी है..' हा संवाद ठेवायला सांगितला आहे.

फुले सिनेमाची नवी रिलीज डेट

सेन्सॉरने संवादांमध्ये करायला सांगितलं आहेच शिवाय 'फुले' सिनेमात जे ऐतिहासिक संदर्भ वापरण्यात आले आहेत, त्याविषयीच्या कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितलं आहे. 'फुले' सिनेमा ११ एप्रिलला रिलीज होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली असून हा सिनेमा सर्व बदलांसकट २५ एप्रिलला रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमात प्रतीक गांधीने महात्मा फुलेंची भूमिका साकारली असून अभिनेत्री पत्रलेखासावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :महात्मा फुले वाडासावित्रीबाई फुलेबॉलिवूडपत्रलेखा