Join us

"कहाँ मिलेगा ऐसा घागरा", गायिका नेहा कक्करने परिधान केलेल्या पिकॉक ग्रीन रंगातल्या लेहंग्याने वेधले चाहत्याचे लक्ष, इतकी आहे त्याची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 16:34 IST

रोहनप्रीत आणि नेहाचे लग्न दिल्लीत झाले असले तरी ते पंजाबमध्ये ही रिसेप्शन देणार आहेत. २० ऑक्टोबरला नेहा आणि रोहनची रोका सेरेमनी पार पडली.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि राइजिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंगसह रेशीमगाठीत अडकलेत. लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

 

या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची जितक्या आतुरतेने फॅन्स वाट पाहत होते तितकीच उत्कंठा बॉलीवुडच्या कलाकारांनाही होती. हळदीपासून ते मेहंदीचे फोटो समोर आल्यानंतर फॅन्ससह बॉलीवुडच्या दिग्गज सेलिब्रिटींनीकडूनही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. 

या सेरेमनीत नेहाने पिकॉक ग्रीन रंगातला लेहंगा परिधान केला होता. डिझायनर अनिता डोंगरेने तिचा हा लेहंगा खास तयार केला आहे. जवळपास ७५ हजार रू. किंमतीचा हा लेहंगा असल्याचे बोलले जात आहे.  तर नवरदेव रोहन प्रीत सिंगनेही  नेहाच्या लेहंग्याला मॅचिंग कुर्ता आणि पायजामासह पगडी बांधली होती. यावेळी सर्वजण एन्जॉय करताना दिसत आहेत.परिधान केलेल्या लेहंग्यात नेहा फारच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये नववधू नेहाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.

दिल्लीतील गुरुव्दारामध्ये नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न झाले. लग्नाच्यावेळी नेहाने पीच रंगचा लहंगा परिधान केलेला दिसतोय. तर रोहनप्रीतने सुद्धा त्याच रंगाची शेरवानी घातली आहे. वधूच्या गेटअपमध्ये नेहा खूपच सुंदर दिसतेय तर शेरवानीमध्ये रोहनप्रीत सुद्धा हँडसम दिसतोय.

लग्नाला नेहा आणि रोहनप्रीतचे जवळचे नातेवाईकच उपस्थित होते. रोहनप्रीत आणि नेहाचे लग्न दिल्लीत झाले असले तरी ते पंजाबमध्ये ही रिसेप्शन देणार आहेत. २० ऑक्टोबरला नेहा आणि रोहनची रोका सेरेमनी पार पडली. दोन दिवसांपूर्वी नेहा आपल्या कुटुंबीयांसोबत दिल्लीला पोहोचली होती.

नेहा आणि रोहन रोका सेरेमनीवेळीभांगडा करताना दिसले होते. रोका सेरेमनीपासून हळदी आणि मेहंदी सेरेमनीचे सगळेच फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटस करत शुभेच्छा दिल्या होत्या. आता लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंवर सध्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. लग्नाचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

टॅग्स :नेहा कक्कर