अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला जवळपास एक आठवडा उलटला आहे. त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकीकडे बॉलिवूडमधील नेपोटिझमला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे डिप्रेशनमुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अशातच प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने सोशल मीडियामधून काढता पाय घेतला आहे. मात्र तिने लिहिलेल्या पोस्टकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.नेहा कक्कर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नेहाने तिच्या आयुष्यातील अनेक घटना चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. ब्रेकअप झाल्यावर नेहाने सोशल मीडियावर व्यक्त होत भावनांना वाट मोकळी केली होती. मात्र आता तिने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिने ही माहिती दिली. मी इथून बाहेर पडते, पण मरणार नाही असे तिने म्हटले आहे.
सोशल मीडियाला नेहा कक्करने केले अलविदा, म्हणाली -...मी मरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 19:55 IST