नेहा धुपिया (Neha Dhupia) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहा धुपियाने आजवर 'चुप चुप के', 'तुम्हारी सुलू', 'सिंग इज किंग', 'करीब करीब सिंगल', 'अ थर्सडे' अशा सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. मात्र, नेहा तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत राहिली. २०१८ मध्ये तिने अभिनेता अंगद बेदीसोबत लग्नागाठ बांधून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर काही महिन्यांतच तिने प्रेग्नसीची घोषणा केली होती. नेहा ही लग्नाअगोदर गरोदर होती. यावर अभिनेत्री आता भाष्य केलं आहे.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना नेहा म्हणाली, "मला हे सांगताना अजिबात संकोच वाटत नाही की, मी लग्नाआधीच गरोदर होते. उलट मला आनंद आहे आणि मी देवाचे आभार मानते की आम्ही गरोदर राहिलो. आमची मुलगी मेहर हा तो आशीर्वाद आहे, तिने आमच्या प्रेमकथेला खऱ्या अर्थाने जन्म दिला. तिच्यामुळेच आम्ही एकत्र येण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला".
अंगद म्हणाला, "मी तब्बल ८ वर्षे नेहाच्या मागे होतो, पण तिने कधीच 'हो' म्हटलं नाही. ती तिच्या करिअरमध्ये इतकी व्यस्त होती की, मी तिच्या नजरेतही नव्हतो". अंगदने नेहाला पटवण्यासाठी चक्क तिच्या आईशी मैत्री केली होती, जेणेकरून तो तिच्या कुटुंबाच्या जवळ जाऊ शकेल.
अंगदने त्यांच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा सांगितला. एका जिममध्ये नेहा ट्रेडमिलवर धावत असताना अंगदने तिला पहिल्यांदा पाहिले होते. "तिची धावण्याची शैली आणि व्यक्तिमत्त्व पाहून मी पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडलो होतो. मला तेव्हाच वाटलं होतं की हीच ती मुलगी आहे", असं अंगदने सांगितलं.
लग्नाआधी गरोदर असण्यावरून नेहावर मोठी टीका झाली होती. त्यावर भाष्य करताना नेहा म्हणाली, "लोक नेहमी दूरवर प्रेमाचा शोध घेत असतात, पण ते तुमच्या जवळच असतं. आमच्या बाबतीत संपूर्ण विश्वाने मेहरला आमच्या आयुष्यात पाठवलं आणि तिच्यामुळेच आमचं कुटुंब पूर्ण झालं. लग्नाआधी प्रेग्नंट असण्यात काहीच गैर नाही, ही आमची निवड होती".
Web Summary : Neha Dhupia candidly admits to pre-marital pregnancy, expressing gratitude for her daughter, Mehr. Angad, her husband, pursued her for eight years. They faced criticism but embraced their choice, cherishing their family.
Web Summary : नेहा धूपिया ने शादी से पहले गर्भवती होने की बात खुलकर स्वीकार की और अपनी बेटी मेहर के लिए आभार व्यक्त किया। अंगद ने आठ साल तक उनका पीछा किया। आलोचनाओं का सामना करते हुए, उन्होंने अपनी पसंद को अपनाया और अपने परिवार को संजोया।