बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या लेक मसाबा हिच्यासोबतच्या ‘मसाबा मसाबा’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. ही सीरिज नीना व त्यांच्या मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. तशा नीना गुप्ता म्हणजे बोल्ड अभिनेत्री. आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलायला त्या कधीच घाबरल्या नाहीत. आता नीना यांनी पहिल्यांदा पती विवेक मेहरा यांच्याबद्दल सांगितले आहे.नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या टॉक शोमध्ये नीना गुप्ता सहभागी झाल्यात. यावेळी त्यांनी त्यांच्या व विवेक मेहरा यांच्या पहिल्याभेटीबद्दल सांगितले.
प्लेनमध्ये झाली होती पहिली भेट....आम्हा दोघांची पहिली भेट प्लेनमध्ये झाली होती. आम्ही दोघेही लंडनवरून मुंबईला परतत होतो. ते दिल्लीचे राहणारे आहेत मात्र मुंबईला कुठल्याशा कामाने येत होते. कदाचित यालाच नशीब म्हणतात. हेच कारण आहे की मी नशीबावर नको इतका विश्वास करते. मी बिझनेस क्लासमध्ये होते. ते सुद्धा तिथेच कुठे होते. मात्र एका महिला तिची सीट चेंज करू इच्छित होते. विवेक यांनी आपली सीट त्या महिलेला दिली व ते माझ्या शेजारी माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसलेत. ती आमची पहिली भेट..., असे नीना यांनी यावेळी सांगितले.
माझे आयुष्य बदलले...विवेक माझ्या आयुष्यात आले आणि माझे अख्खे आयुष्य बदलले. तूच मला फसवलेस, असे विवेक मला गमतीने म्हणतात. मी आधी यावर त्यांच्याशी भांडायचे. तुम्हाला फसवायला मी काय तरूण मुलगी आहे, असे मी म्हणायचे. पण आता मात्र हो, मीच फसवले. माझ्यासोबत खूश नसाल तर जा आणि सुखी व्हा, असे मी सुद्धा त्यांना आता गमतीत म्हणते़, असेही नीना यांनी यावेळी सांगितले.
पतीसाठी शिकल्या साइन लँग्वेजविवेक सतत कॉन्फरस कॉल्समध्ये बिझी असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलण्यासाठी मी साईन लँग्वेजही शिकले आहे. मी त्यांना बदलण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. मला मोकळीक देताना त्यांना अडचण असायची. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला त्यांच्याकडे वेळच नव्हता. वेळ मिळतो तेव्हा ते ढवळाढवळ करतात, पण त्यांची ढवळाढवळ मला आवडते, असे नीना यांनी सांगितले.
2008 मध्ये केले लग्न, ठेवली होती ही अटनीना व विवेक मेहरा यांनी 2008 मध्ये लग्न केले. लग्नाआधी त्यांनी विवेक यांच्यासमोर एक अट ठेवली होती. माझी मुलगी मसाबाला तुम्ही आवडलात तरच मी तुमच्याशी लग्न करेन, असे नीना यांनी विवेक यांना स्पष्ट सांगितले होते.
तो 'बोल्ड' निर्णय घेणा-या नीना गुप्ता आजही आहेत तितक्याच 'बोल्ड'!
Googleवालों, अब तो मेरी उम्र घटा दो...! नीना गुप्तांचा फोटो पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल हेच
लग्न न करता दिला मुलीला जन्म