Join us
Daily Top 2Weekly Top 5

६६ वर्षांच्या नीना गुप्ता यांनी ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, 'बिस्किट ब्रा'वेधलं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:40 IST

नीना गुप्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या बोल्ड स्टाईलसाठी चर्चेत आल्या आहे

Neena Gupta Biscuit Bra Look: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांच्या दमदार अभिनयाव्यतिरिक्त नीना त्यांच्या बोल्ड स्टाईलसाठी देखील ओळखल्या जातात. वयाच्या ६६ व्या वर्षीही त्या नव्या पिढीतील अभिनेत्रींनाही टक्कर देतात. नीना सध्या त्यांच्या आगामी 'मेट्रो इन दिनो' (Metro In Dino) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काल नीना गुप्तांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी नीना यांचा लूक चर्चेचा विषय ठरला.

नीना यांच्या आगामी 'मेट्रो इन दिनो' चित्रपटाचा काल एक कार्यक्रम पार पडला.  या कार्यक्रमात नीना यांनी 'मेट्रो इन दिनो' चित्रपटातील सहकलाकारांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.  या कार्यक्रमात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि दिग्दर्शक अनुराग बसूही उपस्थित होते. यावेळी नीनाचा ड्रेसिंग सेन्स पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

६६ वर्षांच्या नीना गुप्ता यांनी परिधान केलेल्या पांढऱ्या कफ्तानवर गोल्डन 'बिस्किट ब्रा' डिझाइन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा स्टायलिश पोशाख त्यांच्या मुलीचा फॅशन ब्रँड ‘हाऊस ऑफ मसाबा’ यामार्फत डिझाइन करण्यात आला होता. सोशल मीडियावर अनेकांनी ६६ वर्षीय नीना गुप्ताच्या या बोल्ड फॅशनला पसंती दिली.  तर काहींना त्यांना ट्रोल केलंय.  नीनाच्या अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले की 'वय फक्त एक आकडा आहे'.  तर एका युजरने कमेंट केली की, 'तुम्ही तुमच्या वयानुसार कपडे घालावेत'. दुसऱ्याने लिहिले की, 'या वयात तुमच्याकडून अशा प्रकारच्या ड्रेसची अपेक्षा नव्हती'. 

कधी प्रदर्शित होत आहे 'मेट्रो इन दिनो'?

'मेट्रो इन दिनो' येत्या ४ जुलै रोजी रिलीज होत आहे. भूषण कुमार यांच्या टीसीरिजने सिनेमाची निर्मिती केली आहे. संगीतकार प्रीतमने सिनेमात संगीत दिग्दर्शन केलं आहे.सारा आणि आदित्यची फ्रेश जोडी पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :नीना गुप्ताबॉलिवूड