Join us

'नायक 2' विषयी निर्मात्यांची मोठी घोषणा; पुन्हा पडद्यावर दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 09:53 IST

Nayak 2: या सिनेमाचा दुसरा पार्ट यावा यासाठी प्रेक्षक कमालीचे आग्रही होते.  इतकंच नाही तर हा सिनेमा कधी येणार, त्यात पुन्हा अनिल कपूर, राणी मुखर्जी यांची केमिस्ट्री दिसणार का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले होते.

२००१ मध्ये रिलीज झालेला 'नायक' (Nayak) हा सिनेमा त्या दशकातील फ्लॉप सिनेमा ठरला होता. मात्र, हा सिनेमा ज्यावेळी टिव्हीवर टेलिकास्ट करण्यात आला त्यावेळी तो सुपरहिट ठरला. या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली. अनिल कपूर (anil kapoor), राणी मुखर्जी आणि अमरिश पुरी यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका होती.  विशेष म्हणजे लवकरच या सिनेमाचा पुढील पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्याविषयीचे मोठे अपडेट समोर आले आहेत.

या सिनेमाचा दुसरा पार्ट यावा यासाठी प्रेक्षक कमालीचे आग्रही होते.  इतकंच नाही तर हा सिनेमा कधी येणार, त्यात पुन्हा अनिल कपूर, राणी मुखर्जी यांची केमिस्ट्री दिसणार का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. याविषयी आता 'नायक'च्या निर्मात्यांनी मोठी माहिती दिली आहे.

'नायक 2' मध्ये अनिल-राणीची वर्णी?

'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, चित्रपट निर्माते दिपक मुकूट यांनी या सिनेमाविषयी मोठा खुलासा केला आहे. नायक 2' च्या (Nayak 2) चित्रीकरणाचं अंतर्गत काम सुरु झालं आहे. नुकतीच या सिनेमाची स्क्रिप्ट तयार झाली आहे. त्यामुळे लवकरच या सिनेमाची घोषणा करण्यात येईल. तसंच सिनेमाच्या स्क्रिनप्लेवरही काम सुरु असून या दुसऱ्या पार्टमध्ये पुन्हा एकदा अनिल आणि राणीला घेण्याचा प्रयत्न सुरु आहेत", असं दिपक मुकूट म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "आम्ही सिक्वलचा प्लॅन करतोय त्यामुळे आधीच्या सिनेमात जे कलाकार होते त्यांनाच पुन्हा या सिनेमा घेण्याचा आमचा विचार आहे. बऱ्याच वर्षानंतर आम्ही ए.एम.रतनामसोबत काम करणार आहोत. सध्या या सिनेमात मुख्य भूमिकेत कोणाला घ्यावं यावर चर्चा सुरु आहे. अद्यापतरी यासाठी कोणाचं नाव फायनल झालेलं नाही."

दरम्यान, नायक हा सिनेमा १९९९ मध्ये रिलीज झालेल्या मधुलवन या एस शंकर यांच्या सिनेमाचा रिमेक होता. हा सिनेमा २००१ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात राणी मुखर्जी, अनिल कपूर, जॉनी लीवर आणि अमरीश पुरी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

टॅग्स :बॉलिवूडअनिल कपूरराणी मुखर्जीअमरिश पुरीसेलिब्रिटीसिनेमा