Join us

Nawazuddin Siddiqui : 'मला नजरकैदेत ठेवलंय, अन्नपाणीही...' नवाजुद्दीनच्या पत्नीची सासूविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 09:56 IST

नवाजुद्दीनची आई आणि पत्नीमधील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी झैनब उर्फ आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोनेक वर्षांपूर्वी झैनबने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. तर काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या आईने आलिया विरोधात एफआयआर दाखल केली होती. आता पुन्हा आलियाने सासूवर गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीनचा कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार, नवाजुद्दीनची आई आणि पत्नीतील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सासूने सूनेविरोधात तक्रार केल्यानंतर आता सूनेने काही गंभीर आरोप केले आहेत. आलिया म्हणते, 'मला घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. माझ्याच घरात माझे अन्न पाणी बंद करण्यात आले आहे. मला स्वयंपाकघरातही जाऊ दिलं जात नाही. सोफ्यावर झोपावं लागत आहे. मला अक्षरश: नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. घराबाहेर जायची परवानगी नाही. मला आता खूप भीती वाटत आहे.'

आलियाने हे सर्व वकिलाला सांगितलं आहे मात्र अद्याप पोलिसात तक्रार केलेली नाही. नवाजुद्दीनची आई मेहरुन्निसा आणि पत्नी आलिया यांच्यात संपत्तीवरुन वाद असल्याची चर्चा आहे. अनेक दिवसांपासून हे मतभेद त्यांच्यात सुरु आहेत. अंधेरीतील आलिशान बंगल्यात दोघे राहायला गेले तेव्हा हे वाद वाढले. 

नवाजच्या वैयक्तिक आयुष्यात जरी वाद सुरू असले तरी प्रोफेशनल लाईफमध्ये तो एक मोठा स्टार आहे. लवकरच तो 'हड्डी' या सिनेमात झळकणार आहे. यात नवाज तृतीयपंथियाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीपरिवार