Join us
Daily Top 2Weekly Top 5

nawazuddin siddiqui ने मध्यरात्री काढलं पत्नी अन् मुलांना घराबाहेर; Video पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 14:22 IST

Nawazuddin siddiqui: या व्हिडीओमध्ये नवाजने आलियाला तिच्या मुलांसह मध्यरात्री घराबाहेर काढल्याचं दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. नवाजची पत्नी आलिया सिद्दीकी हिने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या नवाज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आलिया एका पाठोपाठ एक नवाजवर आरोप करत असतानाच आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजने आलियाला तिच्या मुलांसह मध्यरात्री घराबाहेर काढल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आलियाने नवाजवर गंभीर आरोप केल्यानंतर काहींनी नवाजवर टीकास्त्र डागलं. तर, काहींनी त्याला निर्दोष मानत पाठिंबा दिला. त्यामुळे नवाजची पाठराखण करणाऱ्यांसाठी तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाली आलिया?

आलियाने अशा व्यक्तींसाठी व्हिडीओ शेअर केला आहे, जे नवाजुद्दीन सिद्दीकी याला निर्दोष मानतात. नवाजने तिला त्यांच्या दोन मुलांसह घरातून बाहेर काढल्याचे आरोप आता आलियाने पतीवर केला आहे. मध्यारात्री रस्त्यावर उभं राहून आलियाने नवाज विरोधात व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

माझी मुलगी कधीपासून रडतीये, तिला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. मला समजत नाहीये की, नवाज असं का करतोय पण, त्याचं हे वागणं त्याला शोभतंय का? मी नवाजच्या बंगल्याबाहेर आहे आणि माझ्यासोबत माझी दोन मुलंदेखील आहेत. त्याने आम्हाला घराबाहेर काढलं आहे, असं आलिया म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी काय करु मला काहीच समजत नाहीये.  नवाज माझ्या मुलांसोबत ज्या पद्धतीने वागतोय त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही. त्याने मध्यरात्री मुलांसोबत बाहेर ठेवलंय. काय करावं मला काहीच कळत नाहीये. आता मी यावेळी जाऊ तरी कुठे?" 

दरम्यान, या पोस्टमध्ये आलियाने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिची मुलं झोपलेली आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.  काही दिवसांपूर्वीच आलियाने मुंबई पोलिसांकडे नवाजविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच तिच्या वकिलांनीही नवाजवर गंभीर आरोप लावले आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूडसेलिब्रिटी