Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये येणार 'ऐश्वर्या मामी'? बिग बींची नात म्हणाली, 'कुटुंबाबाहेरील लोकांना...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:39 IST

बच्चन कुटुंबात सध्या बिनसल्याची चर्चा असताना नव्याने काय उत्तर दिलं वाचा.

अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता नंदाची मुलगी नव्या नवेलीने (Navya Naveli) करिअरची वेगळी वाट धरली आहे. आजी आजोबा, मामा-मामी यांच्यासारखं अभिनयात न येत तिला व्यवसायात रस आहे. तिचे वडील निखिल नंदा मोठे उद्योजक आहेत. नव्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावते. तसंच ती 'व्हॉट द हेल नव्या' (What The Hell Navya) हा पॉडकास्टही चालवते. यामध्ये आतापर्यंत केवळ जया बच्चन आणि श्वेता दोघीच दिसतात. नव्या आपल्या शोमध्ये मामी ऐश्वर्याला बोलवणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतंच तिने या प्रश्नाचं उत्तर दिलंय.

नव्या नवेलीचा 'व्हॉट द हेल नव्या' चा नवीन सिझन काही दिवसांपूर्वीच आला होता. या सीझनमध्येही नव्याने आई आणि आजीसोबत फेमिनिझम वर गप्पा मारल्या. विशेष म्हणजे यंदाच्या सिझनमध्ये नव्याचा भाऊ अगस्त्य नंदानेही हजेरी लावली होती. यानंतर नव्या मामा अभिषेक बच्चन आणि मामी ऐश्वर्यालाही आणणार का? असा प्रश्न तिला विचारण्यात येऊ लागला. यावर ती नुकतंच एका मुलाखतीत म्हणाली, 'मी खरं सांगू तर नाना, मामा, आणि मामीसोबतही मला एक एपिसोड करण्याची इच्छा आहे. तसंच मला आता कुटुंबाबाहेरील लोकांनाही शोमध्ये आमंत्रित करायचं आहे. पण यासाठी मला नवीन सिझन आणाला लागेल."

ऐश्वर्या राय आणि नणंद श्वेता नंदा यांच्यात बिनसल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. दोघीही कॅमेऱ्यासमोर एकत्र येणंही टाळत आहेत. पॅरिस फॅशन वीकमध्ये नव्या नवेलीने पदार्पण केलं. तेव्हा ऐश्वर्याही तिथेच होती. नव्याला चिअर करायला श्वेता आणि जया बच्चन पॅरिसमध्ये होत्या. तेव्हाही एकाच कुटुंबातील असून ऐश्वर्या त्यांच्यासोबत एकत्र दिसली नाही. सध्या बच्चन कुटुंबियांमध्ये सर्वकाही आलबेल नाही असेच गॉसिप ऐकू येत आहेत.

टॅग्स :नव्या नवेलीऐश्वर्या राय बच्चनसोशल मीडिया