Join us
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल क्रश तृप्ती डिमरीने बॉयफ्रेंडसोबत साजरा केला वाढदिवस, कोण आहे 'तो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:00 IST

तृप्ती डिमरीनं बॉयफ्रेंडसोबत आपला वाढदिवस साजरा केल्याचं समोर आलं आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.  गेल्या काही वर्षात तिनं आपल्या अभिनयातून प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. 'लैला मजनू', 'बुलबुल' आणि 'अ‍ॅनिमल' सारख्या चित्रपटांमधून तिने चाहत्यांवर छाप पाडली. तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. ती एका बिझनेसमनला डेट करत असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या. आता नुकतंच तिने आपला वाढदिवस बॉयफ्रेंडसोबत साजरा केल्याचं समोर आलं आहे.

आज तृप्तीचा ३१ वा वाढदिवस आहे. आपला हा खास दिवस तिनं बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबत घालवला आहे.  सॅमने इन्स्टाग्रामवर तृप्तीचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात तृप्ती केक कापताना दिसतेय. तर त्याने आणखी एक फोटो शेअर केलाय. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये 'बर्थडे गर्ल' असं लिहिलं. चाहत्यांनीही तृप्तीवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. 

तृप्ती आणि सॅम मर्चंट यांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या निमित्ताने दोघेही एकत्र सुट्टीवर गेले होते. सोशल मीडियावर अनेक फोटो समोर आले जे याचा पुरावा होते. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती आगामी 'धडक २ या सिनेमामध्ये ती दिसणार आहे. शिवाय आणखीही काही सिनेमांची चर्चा सुरु आहे.

 

टॅग्स :तृप्ती डिमरीसेलिब्रिटीबॉलिवूड