Join us

"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:17 IST

३३ वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुख खानला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. मात्र मराठी लेखिकेने यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

71st National Film Awards: मनोरंजन क्षेत्रात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. यंदा 12th Fail सिनेमासाठी विक्रांत मेसी तर 'जवान'साठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ३३ वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुख खानला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. मात्र मराठी लेखिकेने यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर रोहिणी निनावे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी शाहरुखपेक्षा विकी कौशलने जास्त चांगला अभिनय केल्याचं म्हणत टोला लगावला आहे. "शाहरुख खान बेस्ट अॅक्टर फॉर जवान...लाईक सिरियसली? विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये खूप चांगलं काम केलं होतं", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहिणी निनावेंच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. 

दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानने व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. "ज्यांना मी राष्ट्रीय पुरस्कारसाठी योग्य वाटलो त्या सगळ्यांचे आभार मानतो. माझे दिग्दर्शक, लेखक आणि खासकरून अॅटलीने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या पुरस्काराने मला ही जाणीव करून दिली आहे की अभिनय हे केवळ एक काम नसून ती जबाबदारी आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी मी तुमचे आभार मानतो. हा पुरस्कार मला दिल्याबद्दल भारत  सरकारचेही आभार. हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांसाठी समर्पित करतो", असं शाहरुखने म्हटलं आहे. 

टॅग्स :शाहरुख खानविकी कौशलराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार