Join us

Tanushree Dutta controversy: नाना पाटेकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, जो झुठ है ओ झुठ ही है .....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 17:00 IST

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर हॉर्न ओके प्लिज सिनेमाच्या शूटिंग दरम्यान छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केले आहेत. यावर नाना पाटेकर यांच्याकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली  आहे.

ठळक मुद्देनाना म्हणाले, 'जे खोटे आहे ते खोटेच आहे''लवकरच नाना या प्रकरणावर पत्रकार परिषद घेणार आहेत

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर हॉर्न ओके प्लिज सिनेमाच्या शूटिंग दरम्यान छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केले आहेत. यावर नाना पाटेकर यांच्याकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. नाना म्हणाले, 'जे खोटे आहे ते खोटेच आहे''. या आधीही मी अनेकदा हेच सांगितले आहे. नाना मुंबईत येऊन वकीलांचा सल्ला घेणार आहेत तसेच सिनेसृष्टीतील काही मंडळींशी ते याबाबत चर्चा करणार आहेत. तनुश्रींने नानानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावरदेखील आरोप केले आहेत. तनुश्रीने नानावर लावलेल्या आरोपांनंतर बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रेंटींची तिला साथ मिळाली.

  

तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकीलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. मात्र नानाकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा तनुश्रीने केला आहे. उलट आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप करत वकीलांची आपलीही टीम सज्ज असल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. 

तनुश्रीच्या आरोपांवर नाना येत्या ८ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी ही कलाकार मंडळी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेमध्ये ते तनुश्रीने केलेल्या आरोपांची उत्तर देणार आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नाना पहिल्यांदाच या आरोपांविषयी जाहीरपणे आपली बाजू मांडणार आहेत. 

टॅग्स :नाना पाटेकरतनुश्री दत्ता