Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अजित पवार छोट्या भावासारखे" नाना पाटेकर भावुक; घातपाताच्या शंकावर दिली 'ही' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:04 IST

अजित पवारांबरोबर असलेल्या मैत्रीच्या नात्यावर नाना पाटेकरांनी भाष्य केलं.

Nana Patekar On Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. अशातच, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. "अजित पवार माझ्या लहान भावासारखे होते, चांगले मित्र होते. मी त्यांना नेहमी मिस करेन", अशा शब्दात अजित पवारांबरोबर असलेल्या मैत्रीच्या नात्यावर नाना पाटेकरांनी भाष्य केलं.

नाना पाटेकर आणि अजित पवार यांच्यातील मैत्री दशकानुदशके जुनी होती. नाना म्हणाले, "अजित पवार जेव्हा १९-२० वर्षांचे होते आणि एक कार्यकर्ता म्हणून राजकारणात काम करत होते, तेव्हापासून आमची मैत्री होती. एका सामान्य कार्यकर्त्यापासून पदापर्यंत त्यांनी घेतलेली झेप थक्क करणारी होती. राजकारण बाजूला ठेवा, पण एक माणूस म्हणून मी त्यांना कायम मिस करेन. ते माझ्यासाठी धाकट्या भावासारखेच होते".

अपघाताच्या वादावर भाष्यअजित पवार यांच्या अपघाताबाबत सध्या अनेक संशय आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर नानांनी अत्यंत सावध आणि स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले, "हा पवार कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी एक सामान्य माणूस आहे, त्यामुळे या गोष्टींवर मी काहीही बोलणार नाही. रोहित पवारांनी काकांना गमावले आहे. त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील ते त्यांनी उपस्थित केले. कोणी काही केलं असेल तर, ते चौकशीत समोर येईल. सत्य समोर येईलच आणि त्यांना शिक्षा होईलच".

अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावर भाष्य करताना नाना म्हणाले, "सुनेत्रा वहिनींचे दुःख इतरांपेक्षा खूप वेगळे आहे, ते त्यांनाच सहन करावे लागेल. पण आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ती जबाबदारी त्या नक्कीच सांभाळतील, पण या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना वेळ लागेल".

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar was like a younger brother: Nana Patekar gets emotional.

Web Summary : Nana Patekar mourns Ajit Pawar's passing, recalling their long friendship since Pawar was a young political worker. He dismissed speculation surrounding Pawar's death, calling it a family matter. Patekar expressed confidence in Sunetra Pawar's ability to handle her new responsibilities, acknowledging her grief.
टॅग्स :नाना पाटेकरअजित पवार