Join us
Daily Top 2Weekly Top 5

झकास! माझी लाईफलाईन, माझे हृदय...; अनिल कपूर यांची रोमॅन्टिक पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:25 IST

होय,अलिकडेच अनिल कपूर यांनी पत्नी सुनीता यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली.

ठळक मुद्दे‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात अनिल कपूर, त्यांची मुलगी सोनम कपूर, राजकुमार राव आणि जुही चावला असे सगळे मुख्य भूमिकेत आहेत.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तूर्तास अनिल कपूर या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. कालचं या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर व सोनम कपूर या दोघांनी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कपिलने सोनमला पापा अनिल कपूर तुम्हा तिन्ही भावंडांमध्ये कुणाला सर्वाधिक छळायचे? असा प्रश्न केला. यावर पापा तर खूपचं कूल आहेत. कुणालाच छळत नाही, असे सांगत सोनमने अचानक अनिल कपूर यांच्याकडे वळत, तुम्हाला काय वाटते, कोण अधिक छळते? असा प्रश्न त्यांना केला. यावर तेरी मम्मी...असे अनिल कपूर म्हणाले. या उत्तरावरून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे अनिल कपूर यांच्या घरात त्यांची पत्नी सुनीता कपूर याच खऱ्या बॉस आहेत.

अनिल कपूर यांच्या ताज्या पोस्टवरून तर यावर अगदी शिक्कामोर्तब झालेय. होय,अलिकडेच अनिल कपूर यांनी पत्नी सुनीता यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत, अनिल कपूर यांनी त्याला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा जैसे... प्रेमळ, बॉस लेडी सुनिता कपूर माझी लाईफलाईन, माझे हृदय, माझे घर’, असे मस्त कॅप्शन दिले.

सोबतच त्यांनी चाहत्यांनाही त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबतची स्टोरी पाठविण्याचे आवाहन केले आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात अनिल कपूर, त्यांची मुलगी सोनम कपूर, राजकुमार राव आणि जुही चावला असे सगळे मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूरकपिल शर्मा राजकुमार राव