Join us

'आलिया खूप लाऊड...राहाने तिचा स्वभाव घेऊ नये'; रणबीरने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 18:15 IST

Ranbir kapoor: राहाने आलियासारखं होऊ नये असं म्हणत रणबीरने लेकीने आपल्यातील कोणते गुण घ्यावेत हे सुद्धा सांगितलं आहे.

कपूर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते. आतापर्यंत बॉलिवूडची बेबी अर्थात करीना कपूर-खान (kareena kapoor)हिचा लेक तैमूर सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत होता. मात्र, आता तैमूरचं सगळं लाइमलाइट रणबीर कपूरच्या लेकीने खेचून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर (ranbir kapoor) आणि आलियाने (aalia bhatt) त्यांच्या लाडक्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली. विशेष म्हणजे तेव्हापासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त राहाचीच चर्चा रंगली आहे. यामध्येच आता रणबीरने राहाविषयी एक वक्तव्य केलं आहे.  'राहा कधीच आलियासारखी होऊ नये' असं तो म्हणाला आहे. त्यामुळे त्याचं हे विधान सध्या चर्चेत आलं आहे.

राहाच्या जन्मानंतर १ वर्षानंतर रणबीर-आलियाने त्यांच्या लेकीचा चेहरा मीडियाला दाखवला. त्यापूर्वी प्रत्येक मुलाखतीमध्ये ते राहाविषयी व्यक्त व्हायचे. ती कशी दिसते, कधी मस्ती करते ते कायम सांगायचे. त्यामुळे नेटकरी तिची झलक पाहण्यासाठी आतूर झाले होते. यामध्ये अलिकडेच रणबीर-आलियाने राहाला पहिल्यांदाच कॅमेरासमोर आणलं आणि तिचे फोटो क्षणार्थात व्हायरल झाले. यामध्येच त्याची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने राहा, आलियासारखी नसावी असं म्हटलं आहे."राहा आलियासारखी दिसावी अशी माझी इच्छा होती. पण, तिने स्वभाव मात्र तिचा घेऊ नये. राहाने स्वभाव, पर्सनालिटी माझ्यासारखी घ्यावी", असं रणबीरने म्हटलं. सोबतच तिचा स्वभाव आलियासारखा का नसावा यामागचं कारणही त्याने सांगितलं.

"आलियाची पर्सनालिटी खूप लाऊड म्हणजेच बोल्ड आहे. ती खूप बोलते, तिच्यात खूप एनर्जी आहे. त्यामुळे जर घरात एक सारख्याच दोन मुली असल्या तर मला सांभाळणं कठीण होईल. त्यामुळे राहा माझ्यासारखी शांत स्वभावाची असावी. त्यामुळे दोन शांत स्वभावाच्या व्यक्ती आलियाला सहज सांभाळून घेईल", असं तो म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मी आयुष्यात खूप जणांची मन दुखावली आहेत. त्यामुळे राहाने तो गुण मात्र माझा घेऊ नये." दरम्यान, रणबीर आणि आलियाने १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियाने राहाला जन्म दिला. विशेष म्हणजे राहा हुबेहूब कपूर कुटुंबाची कार्बन कॉपी आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटबॉलिवूडसेलिब्रिटी